छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत महायुतीने २० पैकी १८ जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवले आहे. या विजयावर काँग्रेसचे खासदार कल्याण काळे यांनी गंभीर आरोप केला आहे. ही निवडणूक ‘धनशक्ती’च्या जोरावर जिंकली असून, मतदारांना कंटाळा येईपर्यं
.
रविवारी सकाळी आठ वाजल्यापासून जिल्हा मध्यवर्ती बँकेत मतमोजणीला सुरुवात झाली. महायुतीने संचालक मंडळ निवडणुकीत निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले. काँग्रेसला केवळ एक जागा मिळाली, तर उद्धवसेनेलाही एक जागा मिळाली.
निवडणुकीतील सर्वाधिक चर्चेच्या बिगर शेती मतदारसंघात काँग्रेसचे खासदार कल्याण काळे यांनी अभिजीत देशमुख यांचा पराभव केला. काळे यांना ४८ मते मिळाली, तर देशमुख यांना २६ मतांवर समाधान मानावे लागले.
बिगर शेती मतदारसंघातून महायुतीचे अतुल सावे (२६७ मते), अंबादास दानवे (२१०), रामराव (रामूकाका) शेळके (२३७), अर्जुन पाटील (२२३) आणि रवींद्र काळे (१८९) हे पाचही उमेदवार विजयी झाले. इतर मतदारसंघातून आमदार अनुराधा चव्हाण (७४९ मते), मुक्ता तांगडे (६४० मते) आणि सुवर्णा जाधव (५४० मते) यांनीही विजय मिळवला.
खासदार कल्याण काळे यांनी आपल्या आरोपाचा पुनरुच्चार करत म्हटले की, “जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक महायुतीने धनशक्तीच्या जोरावर जिंकली आहे. शेतकऱ्यांच्या या बँकेत मतदारांना मोठ्या प्रमाणात पैसे वाटण्यात आले. लोकांना कंटाळा येईपर्यंत भेटून प्रत्येक भेटीत पैसे दिले गेले. त्यामुळे ही निवडणूक धनशक्तीवर जिंकली गेली.”
या आरोपांना ओबीसी विकास मंत्री अतुल सावे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. सावे म्हणाले, “मतदारांनी आम्हाला पाठिंबा दिला आहे. मग कल्याण काळे यांचा विजय धनशक्तीने झाला का, हे त्यांनी स्पष्ट करावे. लोक आमच्या पाठीशी आहेत.”



हे ही वाचा…
छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँक निवडणूक:कल्याण काळे, संजना जाधव, अंबादास दानवे, अतुल सावे विजयी
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या राजकीय आणि सहकार वर्तुळाचे लक्ष लागून राहिलेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या चुरशीच्या निवडणुकीत काँग्रेसचे खासदार कल्याण काळे आणि आमदार संजना जाधव, भाजपचे शेषराव जाधव, प्रभाकर काळे यांनी विजय मिळवला आहे. तर अंबादास दानवे आणि मंत्री अतुल सावे हे विजयी झाले आहेत. सविस्तर वाचा…