Headlines

वसमत – परभणी मार्गावर दरोड्याचा प्रयत्न:तिघे ताब्यात, चार घरफोड्या उघडकीस; पाच लाखांचा मुद्देमाल जप्त

वसमत ते परभणी मार्गावर वसमत पासून काही अंतरावर दरोडेच्या तयारीत असलेल्या पाच जणांपैकी तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी ता १२ पहाटे ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून पाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यांना वसमत शहर पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत शहरामध्ये एक शटर फोडून शेतकऱ्याची हळदीची चोरी झाली होती तसेच…

Read More

चारित्र्यवान व व्यसनमुक्त पिढीच देशाची खरी संपत्ती- प्रमोद पोकळे:राष्ट्रसंत अध्यात्म केंद्र, दासटेकडी येथे विविध प्रात्यक्षिकांद्वारे सुसंस्कार शिबिराचा समारोप‎

‘मोबाइल, सोशल मीडियाच्या युगात तरुणाई व्यसनांच्या आहारी जात आहे. या व्यसनाधीनतेमुळे देशाचे भविष्य धोक्यात आले असून, त्यांना वेळीच सुसंस्कारांचे बाळकडू देणे गरजेचे आहे. अशा शिबिरांमधून घडलेली सशक्त, व्यसनमुक्त चारित्र्यवान नवपिढीच भारताची खरी संपत्ती ठरेल,’ असे प्रतिपादन संस्थेचे सचिव प्रमोद पोकळे यांनी केले. गुरुकुंज-मोझरी जवळील राष्ट्रसंत अध्यात्म केंद्र, दासटेकडी येथे आयोजित श्रीगुरुदेव सर्वांगीण सुसंस्कार शिबिराचा समारोप…

Read More

अमरावती जीएमसीची प्रस्तावित जागा वनखात्यात अडकली:प्रशासनासमोर पेच, पर्यायी जागेचा विचार सुरू

अमरावती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची (जीएमसी) अलियाबाद येथील प्रस्तावित जागा वनखात्यात अडकली आहे. वर्षभरापूर्वी सुरू झालेल्या या महाविद्यालयासमोर आता जागेचा पेच निर्माण झाला आहे. प्रशासनासमोर नव्या जागेचा पर्याय स्वीकारायचा की सध्याच्या जागेचे आरक्षण बदलून घ्यायचे, असा प्रश्न उभा राहिला आहे. या संदर्भात नुकतीच जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत एक बैठक पार पडली. या बैठकीला महसूल आणि वनखात्याचे…

Read More

25 वर्षांनंतरही सोयाबीन पिकाला सक्षम पर्याय मिळेना:मका, तुरीचे क्षेत्र वाढणार, खरीप पेरणीपूर्वीच अमरावतीच्या बळीराजासमोर आव्हानांचा डोंगर‎

खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी तयारी सुरू केली आहे. मागील तीन ते चार वर्षांपासून खरिपातील मुख्य पीक असलेल्या सोयाबीनमधून अपेक्षित उत्पादन मिळत नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. कपाशीचीही स्थिती काहीशी अशीच आहे. परिणामी, यंदा जिल्ह्यात सोयाबीनच्या पेरणी क्षेत . जिल्ह्यात गेल्या २५ ते २६ वर्षांपासून खरीप हंगामात मुख्यतः सोयाबीन आणि कपाशी हीच दोन पिके घेतली जात आहेत. या…

Read More

जायकवाडीत 30 टक्के पाणीसाठा:संभाजीनगरला महिनाभर पुरेल इतक्या पाण्याची 8 तासांत आवक‎, नाशिकसह वरच्या भागात मुसळधार पावसामुळे विसर्ग

नाशिक जिल्हा आणि जायकवाडी धरणाच्या वरील पाणलोट क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे धरणात गुरुवारी दिवसभरात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली. अवघ्या आठ तासांमध्ये धरणाच्या जिवंत पाणीसाठ्यात एका टक्क्याची वाढ झाली असून, या वाढलेल्या पाणीसाठ्यामुळे छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्याची महिनाभराची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे. दोन्ही जिल्ह्यांना महिनाभर पुरेल एवढा पाणीसाठा ८ तासांत जमा झाल्याची माहिती…

Read More

अनिरुद्धाचार्य हरियाणवी ताऊला म्हणाले- पत्नीला रोज 'आय लव्ह यू' म्हणा:उत्तर मिळाले- मी 'आईलबलू' कसे म्हणू, रोज मारामारी होते; VIDEO व्हायरल

सोशल मीडियावर आपल्या अतरंगी आणि मजेदार संवादांसाठी प्रसिद्ध असलेले कथावाचक अनिरुद्धाचार्य जी यांच्या दरबारात यावेळी हरियाणातील एका वृद्ध ताऊ मक्खन शर्मा यांनी आपल्या हजरजबाबीपणाने सर्वांची मने जिंकली. कथावाचक अनिरुद्धाचार्य यांना भेटलेल्या या वृद्धाने जेव्हा माईक हातात घेतला, तेव्हा मंडपात कुणाचेही हसू थांबले नाही. पिवळी पगडी घातलेल्या ताऊने मोठ्या भोळेपणाने बाबांसमोर आपली घरगुती समस्या मांडली. ताऊ…

Read More

कठीण "कॅट' परीक्षा क्रॅक करत स्नेहा लांडगे 'आयआयएम रोहतक'मध्ये:५ नामांकित "आयआयएम' कडून आले होते प्रवेशासाठी कॉल

रावसाहेब मरकड | शेवगाव येथील आबासाहेब काकडे संचलित काकडे विद्यालयाची माजी विद्यार्थिनी स्नेहा बाबासाहेब लांडगे हिने व्यवस्थापन (मॅनेजमेंट) क्षेत्रात राष्ट्रीय पातळीवर घवघवीत यश संपादन केले आहे. देशातील सर्वोच्च संस्थांपैकी एक असलेल्या ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट’ (आयआयएम, रोहतक-हरियाणा) येथे पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी स्नेहाची निवड झाली. देशातील अत्यंत कठीण मानल्या जाणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील ‘कॅट’ प्रवेश परीक्षेत स्नेहाने उत्तम…

Read More

धनंजय देशमुखांविरोधातील तक्रार निघाली खोटी!:आमदार मुंडेंनी गोळीबार केल्याचाही दावा खोटा; बीडमध्ये रंगले खोट्या तक्रारींचे नाट्य

कधीही न घडलेल्या गुन्ह्यांचे दाखल झालेले गुन्हे अन् नंतर थेट आमदार धनंजय मुंडेंनी गोळीबार केल्याची तक्रार यामुळे रविवारचा दिवस चर्चेचा आणि बीड पोलिसांना तापदायक ठरला. दिवसभराच्या गोंधळानंतर हा सर्व प्रकार खोटा असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले गेले. मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी शिवीगाळ केली, तसेच त्यांच्या पोलिस अंगरक्षकाची पिस्तूल काढून ती…

Read More

Supriya Sule Health Update; Doctor Advises Voice Rest

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आपल्या स्पष्ट आणि आक्रमक वक्तृत्वाने नेहमीच राजकीय मैदान गाजवणाऱ्या सुप्रिया सुळे यांना आगामी काही दिवस शांत राहावे लागणार आहे. घशामध्ये स . सुप्रिया सुळे यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट शेअर करत म्हटले की, “आज मी घसा आणि आवाजाच्या…

Read More

पडेगावमध्ये खोदकामात गंभीर निष्काळजीपणा:कंत्राटदार-अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा, मनपा गटनेते गणेश लोखंडे यांची पोलिस आयुक्तांकडे मागणी

पडेगाव परिसरात मुंबई-नाशिक महामार्गावरील रस्ता रुंदीकरणाच्या कामात महावितरणमार्फत अंडरग्राऊंड केबल टाकण्यासाठी करण्यात आलेल्या खोदकामात गंभीर निष्काळजीपणा झाला असून संबंधित कंत्राटदार व अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी महानगरपालिका शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गटनेते गणेश लोखंडे यांनी पोलीस आयुक्तांकडे केली. गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्यास उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही…

Read More