![]()
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर राज्याचे माजी मुख्यमंत्री व कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी टीका केली आहे. ते म्हणाले, मोदी सरकारला 2029 च्या निवडणुकीची खात्री नाही, मला खात्री आहे. 2029 मध्ये सत्ता बदल होणार हे नक्की. मात्र, यासाठी विरोधकांनी एकत्र राहणे गरजेचे असून केंद्र सरकारची घटका भरली आहे. अमित शहा हे आपल्या कार्यालयात येऊन बसत होते, मात्र संसदेत येत नव्हते. संसदेत मी 19 वर्षे काम केले आहे. अमित शहा यांनी जाहीर केले असते की आम्ही सभागृहात बोलणार आहोत तर आम्ही थांबलो असतो. सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता का? अमित शहा नालायक गृहमंत्री आहेत, अशी टीका चव्हाण यांनी केली आहे. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, अमित शहा संसदेच्या अधिवेशन काळात सभागृहात आलेच नाही. सभागृहाला सामोरे जायला तुम्ही घाबरता हेच यातून सिद्ध होते. अमित शहा सभागृहात आले नाही हा घटनेचा, सभागृहाचा आणि जनतेचा अपमान आहे. तुम्ही नालायक गृहमंत्री आहात. पंतप्रधान मोदी यांचे जगभरात हासे होत आहे. कोणता पुरस्कार देणार असाल, तर मोदी येतील असे परराष्ट्र मंत्रालयाकडून इतर देशांना सांगितले जात आहे. एपस्टीन फाईलमध्ये अनिल अंबानी, पंतप्रधान मोदी, परराष्ट्र खात्यातील एक अशी तिघांची नावे असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. केंद्र सरकार आता माघारीच्या मोडमध्ये गेले पुढे बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, शिक्षण आणि परीक्षेबद्दल जे आंदोलन झाले ते भूतो न भविष्याती असे होते. केंद्र सरकार आता माघारीच्या मोडमध्ये गेले आहे. प्रधानमंत्री मोदी आता व्हिडिओ करत आहेत. मोदी सरकार आता पॅनिक परिस्थितीत आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रिपद ज्यांना दिले आहे त्यांनी आधीच अकलेचे तारे तोडले आहेत. शिक्षण आणि परीक्षा बदलेल असा व्यक्ती मला मोदी सरकारमध्ये दिसत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नावहीह आघाडीवर होते, पण परिस्थिती बदलली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांचे नाव घेतले जाते, पण राज्यात टीईटी पेपर फुटला आहे. त्यामुळे त्यांना काही आम्ही स्वीकारणार नाही. मात्र, आम्हाला चांगला शिक्षणमंत्री पाहिजे आहे, तुमच्या पक्षात नसेल तर इतर पक्षातला घ्या. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा नैतिक जबाबदारी स्वीकारून नाही तर विद्यार्थ्यांच्या दबावामुळे आला असल्याचेही ते म्हणाले. मोदी सरकारला 2029 च्या निवडणूकीची खात्री नाही तसेच मोदी सरकारला 2029 च्या निवडणूकीची खात्री नाही, 2/3 बहुमतासाठी राजकीय पक्ष फोडले जात आहेत. डिलिमिटेशनच्या प्रस्तावाला काँग्रेसचा विरोध आहे, दक्षिणेतील राज्यांनी गेल्या काही वर्षांत प्रगती साधली आहे त्यामुळे हे बिल पास झाल्यास प्रादेशिक समतोल ढासणार असल्याने डेलिमिटेशन विरोध आहे. तसेच विरोधी पक्ष संपवून टाकायचे असे सरकारचे धोरण असल्याचा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.
Source link
अमित शहा नालायक गृहमंत्री:सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता का? पृथ्वीराज चव्हाण संतापले