Headlines

आवक मंदावल्याने भाजीपाला दरात वाढ:वांगी, टोमॅटोसह पालक, मेथी, कोथिंबीर आदी पालेभाज्या झाल्या महाग‎



पापरी जून महिना उजाडून २० दिवस उलटले तरी पावसाने काही हजेरी लावली नाही. शेतातील उभ्या फळबागा पिकांसह भाजीपाला व इतर तरकारी माळव्यालाही याचा फटका बसत आहे. ठोक बाजारात शेपू, मेथी, कोथिंबीर, पालक, चुका यासह अन्य पालेभाज्या तसेच वांगी, कोबी, टोमॅटो यांची

.

यंदा मात्र पावसाने दडी दिली. त्यामुळे कूपनलिका, विहिरी यांची पाणी पातळी खालावली असल्याने अनेकांनी केलेली भाजीपाला पिके करपून गेली तर गत महिन्यात सोलापूर जिल्ह्यात विविध ठिकाणी झालेले वादळीवारे पावसामुळे अनेक शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्यावर नियोजन करून केलेल्या भाजीपाला तरकारी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नूकसान झाले आहे.

त्यामुळे सोलापूरसह पंढरपूर शहरातील भाजीपाला ठोक बाजारपेठेत विविध गावांतून पालेभाज्यांची तसेच वांगी, टोमॅटो, काकडी आदीची आवक मंदावल्यामुळे पालेभाज्यांचे दर महागले असल्याचे आठवडी बाजारातील भाजीपाला विक्रेत्यांकडून सांगण्यात येते आहे. देशी वांगी, टोमॅटो, काकडी, देशी गवार यांनी शंभरी गाठली आहे. कोणताही भाजीपाला घ्या तो ३० रुपयांस पावकिलो झाला आहे. किरकोळ बाजारात पालेभाजांचे सध्याचे दर ठोक बाजारात भाजी पाल्याची आवक घटली

^आम्ही पंढरपूर बाजारातून ठोक भाजीपाला खरेदी करून तो विविध गावच्या आठवडा बाजारात विकतो, गत काही दिवसांपासून ठोक बाजारात भाजीपाल्याची आवक घटली असून, तो वधारला आहे. मध्यंतरी झालेल्या वादळी वाऱ्याने तसेच पावसाने अनेक ठिकाणच्या भाजीपाल्याचे नुकसान झाले. त्यामुळे उत्पादन घटल्याने बाजारात आवक कमी झालीये.

आम्हीही निम्म्यावरच खरेदी सुरू केली आहे. वांगी, टोमॅटो, काकडी यांनी शंभरी गाठलीय. -विजय पाखरे, कोन्हेरी, ता. मोहोळ पालक जुडी-२० रुपये, मेथी जुडी ३० रुपये, कोथिंबीर जुडी ४० रुपये, शेपू जुडी २५ रुपये, चुका जुडी- २५ रुपये, कोबी ३० रुपये, फ्लॉवर-४० रुपये, काकडी-१०० रुपये किलो, बटाटा-२५ रुपये, देशी वांगी-१०० रुपये किलो, कारले ८० रुपये किलो, शेवगा-२५ रुपयास ४ शेंगा,टोमॅटो-१०० किलो, दोडका – ७० रुपये किलो, देशी गवार-१२० रुपये किलो, पुणेरी गवार- १०० किलो.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *