Headlines

कन्नडच्या रुग्णालयात दररोजची ओपीडी 500 अन् खाटा फक्त 50:उपजिल्हा रुग्णालयाचा प्रस्ताव 7 वर्षांपासून धूळखात‎




शहरासह ग्रामीण भागातील रुग्णांसाठी महत्त्वाचा असलेला उपजिल्हा रुग्णालयाचा प्रस्ताव ७ वर्षांपासून शासनदरबारी धुळखात पडला आहे. लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे आणि राजकीय इच्छाशक्तीअभावी हा प्रस्ताव प्रलंबित असून, कन्नडकरांना अद्ययावत सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. रुग्णालयात रोजची रुग्णसंख्या ५०० आहे. खाटा केवळ ५० आहेत. त्यामुळे अनेकांना उपचारासाठी मोठ्या शहरात धाव घ्यावी लागत आहे. कन्नड रुग्णालय सोलापूर-धुळे या राष्ट्रीय महामार्गावर आहे. रुग्णालयात दररोज सरासरी ४ ते ५ एमएलसी दाखल होतात. तालुक्यातील गौताळा अभयारण्यामुळे सर्पदंश, विंचूदंश आणि विषबाधेचे रुग्ण सातत्याने उपचारासाठी येतात. या रुग्णालयाची दैनंदिन ओपीडी ५०० रुग्णांची आहे. वर्षाला १३,५०० ते १४,००० प्रसूती येथे होतात. रुग्णालयात सध्या ग्रामीण रुग्णालयाचे ३० आणि ट्रॉमा सेंटरचे २० मिळून केवळ ५० बेड उपलब्ध आहेत. याकडे आरोग्य विभागाने लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांंमधून आहे. प्रस्ताव मंजूर झाल्यास खाटांची संख्या आणखी ५० ने वाढेल. एकूण १०० खाटांचे अद्ययावत रुग्णालय तयार होईल. एमडी मेडिसिन, सर्जन, वर्ग-२ चे दोन अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी, १४ अधिपरिचारिका, नवीन औषधनिर्माण शास्त्रज्ञ आणि ३ शस्त्रक्रिया गृहपरिचर उपलब्ध होतील. यामुळे गुंतागुंतीच्या प्रसूती, बालरोग, अपघातांवर कन्नडमध्ये उपचार शक्य होतील. मंजूरी मिळाली तर गंभीर रुग्णांवर कन्नडलाच उपचार ७ वर्षांपासून पाठपुरावा सुरू ५० गंभीर रुग्ण रेफर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *