![]()
दि. २ जून रोजी अचानक झालेल्या वादळी वाऱ्यामुळे करमाळा तालुक्यातील करंजे, भालेवाडी गावातील १०० एकर केळी पिकाचे सुमारे ३ ते साडेतीन कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. गावातील काही घरावरील पत्रे सुद्धा उडून गेलेले आहेत तर लाइटचे पोल वाऱ्याने वाकलेले आहेत, तर काही ठिकाणी पडले आहेत. त्यामुळे गावातील लाइट दोन दिवस झाले बंद आहे. शेतकऱ्याचे आंबा, ऊस इतर पिकांचेही अतोनात नुकसान झाले आहे. मंगळवार दि. २ जून रोजी झालेल्या वादळी वारे व पावसामुळे शेतकऱ्यांचे केळी ऊस आंबा या पिकांचे अतोनात नुकसान झाले असून त्वरित पंचनामा करण्याचे आदेश तहसीलदार शिल्पा ठोकडे आणि तालुका कृषी अधिकारी राजेंद्र नेटके यांनी दिले आहेत. करंजे भालेवाडी गावामध्ये कमीत कमी २१ ते २२ अशा शेतकऱ्यांचे केळी पिकाचे अतोनात नुकसान झाले असून सध्या गाव पातळीवर गाव कामगार, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक यांच्यामार्फत पंचनामे चालू आहेत. शेतकऱ्यांचे असे म्हणणे आहे की १ एकर केळी लागवडीसाठी किमान २ ते अडीच लाख रुपये खर्च येतो व ते पीक जाण्यायोग्य झाल्यास एकरी ५ लाख रुपये उत्पन्न निघते. पण काल झालेल्या वादळी वाऱ्यामुळे आमच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले असून सरकारने आम्हाला पंचनामे करून ताबडतोब मदत जाहीर करावी, अन्यथा आम्हाला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही, असे व्यथित झालेल्या शेतकऱ्यांनी आपले म्हणणे मांडले. करंजे गावातील काही शेतकऱ्यांच्या घरावरील पत्रे ही उडून गेलेले आहेत व गुरे बांधण्याचे गोटेही पडलेले आहेत. या अस्मानी संकटामुळे शेतकरी पूर्णपणे हतबल झालेला आहे आता काय करावे हे त्यांच्यापुढे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रतिनिधी | कुर्डुवाडी माढा तालुक्यातील निमगाव टें परिसरात सोमवारी मध्यरात्री अचानक आलेल्या तुफान वादळी वाऱ्याने आणि विजेच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसाने प्रचंड तांडव माजवले. निमगावच्या इतिहासात पहिल्यांदाच वाऱ्याचा वेग इतका भयानक होता की, काढणीच्या अंतिम टप्प्यात आलेल्या केळी, डाळिंब, आंबा, पेरू, द्राक्षाच्या बागा क्षणार्धात उद्ध्वस्त झाल्या. या नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले असून बळीराजा पूर्णपणे हतबल झाला आहे. सोमवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास वाऱ्याचा वेग प्रचंड वाढून सुमारे दीड तास वादळी वारे आणि मुसळधार पावसाने परिसरात थैमान घातले. नुकसानीचे गांभीर्य ओळखून तलाठी प्रीती काळे आणि सहाय्यक कृषी अधिकारी अमर मेहेर यांनी तातडीने ४५ हेक्टरवरील फळबागांची प्राथमिक पाहणी केली असता, निमगाव टें मंडळात पाऊस मोजण्याचे अधिकृत यंत्रच उपलब्ध नाही. वादळामुळे पिंपळणेर, बादलेवाडी, शेडसिंगे आणि उपळवाटे रोडवर झाडे पडल्याने वाहतूक ठप्प झाली होती. ^काल झालेल्या वादळी वाऱ्यामुळे आमच्या भालेवाडी गावातील ३० ते ३५ एकर केळी बागा भुईसपाट झालेले आहेत. कमीत कमी दोन ते अडीच कोटी रुपयाचे नुकसान झाले आहे. घरावरील पत्रे सुद्धा वादळी वाऱ्यामुळे उडून गेलेले आहेत. गावांमध्ये दोन दिवसापासून लाइटचे पोल पडल्यामुळे लाईट पण बंद आहे. तसेच शासनाने याकडे त्वरित लक्ष देऊन ताबडतोब आम्हा गरीब शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून द्यावी. शशिकांत पवार, शेतकरी, भालेवाडी. ^दि. २ जून रोजी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे करंजे भालेवाडी येथील शेतकऱ्यांच्या केळी बागांचे अतोनात नुकसान झाले आहे. तसेच इतर पिकामध्ये डाळिंब,ऊस, पपई आंबा या पिकांचेही भरपूर प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचे नुकसान झालेल्या या पिकांचे त्वरित पंचनामे आमच्या कृषी सहाय्यकाकडून ग्रामसेवक , तलाठ्याकडून चालू आहेत. पंचनामे झाल्यानंतर वरिष्ठ कार्यालयास अहवाल सादर करून शेतकऱ्यांना जास्तीत- जास्त आणि लवकरात लवकर मदत मिळवून देवू. राजेंद्र नेटके, तालुका कृषी अधिकारी, करमाळा. ^यामध्ये पाहणी करण्याच्या सूचना आम्हाला नव्हत्या. परंतू नैसर्गिक आपत्तीचे गांभीर्य ओळखून आम्ही प्रत्यक्ष प्लॉटवर जाऊन ४५ हेक्टर क्षेत्राची प्राथमिक पाहणी केली आहे. उर्वरित भागाची पाहणी करून वरिष्ठांकडे अहवाल पाठवला जाईल. अमर मेहेर, सहाय्यक कृषी अधिकारी ^झालेल्या वादळी वाऱ्यामुळे करंजे भालेवाडी गावातील शेतकऱ्यांच्या केळी पिकाचे, तसेच डाळिंब, पपई, ऊस या पिकांचेही अतोनात नुकसान झाले आहे. केळी पिकासहीत इतर पिकाच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले असून पंचनामे करणे चालू झाले आहे. पंचनामे करून त्वरीत वरिष्ठांकडे नुकसानीचा अहवाल पाठवून शेतकऱ्यांना शासनाकडून त्वरित मदत मिळवून देण्यात येईल. – शिल्पा ठोकडे, तहसीलदार, करमाळा. ^काल झालेल्या वादळी वाऱ्यामुळे आमच्या गावातील माझ्यासह २० ते २१ शेतकऱ्यांच्या ६० ते ६५ एकर केळी बागा भुईसपाट झालेल्या आहेत. तसेच इतर पिकांमध्ये डाळिंब, पपई, ऊस, आंबा या पिकांचेही अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे सरकारने पंचनामा करून ताबडतोब मदत करावी. – रविकिरण फुके, शेतकरी, करंजे. करमाळा तालुक्यातील करंजे भालेवाडी येथे निसर्गाने घातलेले थैमान केवळ पिकांचे नुकसान करणारे नसून बळीराजाच्या जगण्याचा पाया उखडून टाकणारे आहे. रविकिरण फुके आणि शशिकांत पवार या शेतकऱ्यांनी व्यक्त केलेली आत्महत्येची भीती या संकटाची भीषणता स्पष्ट करते. एकरी अडीच लाख रुपये खर्च करून उभी केलेली केळीची बाग जेव्हा काढणीच्या तोंडावर एका झटक्यात भुईसपाट झाली आहे.
Source link
करमाळा, माढ्यात पुन्हा वादळाचा हाहाकार:करंजे भालेवाडीत 100 एकर केळी भुईसपाट, साडेतीन कोटींचे नुकसान