![]()
नेवासे तालुक्यात वाहनांवर व इतरत्र ‘प्रेस’ नाव टाकून पत्रकार पदाचा गैरवापर करणाऱ्या आणि शासकीय कर्मचाऱ्यांना ब्लॅकमेल करणाऱ्या तोतया पत्रकारांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नेवासा प्रेस क्लबच्या वतीने पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनात नमूद केले आहे की, तालुक्यात लोकशाहीचा चौथा स्तंभ बदनाम करणाऱ्या बोगस पत्रकारांचा मोठ्या प्रमाणावर सुळसुळाट झाला आहे. नुकताच एका तोतया पत्रकारावर अपहरणाचा गुन्हा दाखल झाल्याने या बोगसगिरीचे गांभीर्य समोर आले आहे. दोनचाकी व चारचाकी वाहनांवर ‘प्रेस’ असे लिहून हे तोतया पत्रकार शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना नाहक त्रास देत असून ब्लॅकमेलिंग करत आहेत. या बोगसगिरीला आळा घालण्यासाठी वाहनांवर अनधिकृतपणे ‘प्रेस’ लिहिणाऱ्यांवर तात्काळ कायदेशीर कारवाईची मोहीम राबवावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी प्रेस क्लबचे अध्यक्ष गुरुप्रसाद देशपांडे, मोहन गायकवाड, उपाध्यक्ष कैलास शिंदे, नाना पवार,अशोक डहाळे, रमेश शिंदे, शाम मापारी, सुधीर चव्हाण, सुहास पठाडे, मकरंद देशपांडे, पवन गरुड, शंकर नाबदे, अभिषेक गाडेकर उपस्थित होते.
Source link
बोगस पत्रकारांवर कडक कारवाई करा:नेवासे प्रेस क्लबचे प्रताप दराडे यांना निवेदन