![]()
एकीकडे विदर्भातील वाढत्या तापमानाची चर्चा असताना, दुसरीकडे याच उष्णतेवर मात करण्यासाठी अमरावती महानगरपालिकेने राबवलेल्या ‘कूल रूफ’ धोरणाने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले आहे. राज्य शासनाच्या मानाच्या राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान व स्पर्धा २०२५-२६ मध्ये अमरावतीने प्रथम क्रमांक पटकावत १० लाख रुपयांचे पारितोषिक आपल्या नावे केले आहे. पुणे, मीरा-भाईंदर, नवी मुंबई यांसारख्या मोठ्या महानगरपालिकांशी स्पर्धा करत अमरावतीने हा मान मिळवणे विशेष उल्लेखनीय आहे. कर विभाग आणि इमारत विभाग यांना एकत्रित करणाऱ्या एका विशेष डिजिटल पोर्टलद्वारे या नियमांची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. ही स्पर्धा दोन टप्प्यांत पार पडली. पहिल्या टप्प्यात ऑनलाइन अर्ज सादर करण्यात आला, ज्यामध्ये कूल रूफ उपक्रमाची सविस्तर माहिती देण्यात आली. या अर्जाच्या आधारे अमरावती महानगरपालिकेची दुसऱ्या फेरीसाठी निवड झाली. दुसऱ्या टप्प्यात मा. महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली सादरीकरण झाले, ज्यामध्ये उपक्रमाची परिणामकारकता, नवकल्पना व अंमलबजावणीची मांडणी करण्यात आली. मुंबईत आयोजित सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा पुरस्कार अमरावती मनपा आयुक्त वर्षा लड्डा-भाप्रसे य व उप अभियंता हेमंत महाजन, उर्वरित, पान.४ राज्यातील पहिली मनपा राज्यातील पहिले शहर रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञानाचा वापर करून ‘कूल रूफ’ उपनियम तयार करणारी अमरावती ही महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका आहे. उष्णता निवारण शहरांमधील वाढते तापमान कमी करणे आणि सौर परावर्तक छतांद्वारे ऊर्जेची बचत करणे हा या नियमावलीचा मुख्य उद्देश आहे. हे नियम नवीन इमारतींसाठी बंधनकारक करण्यात आले असून, ते इमारत परवानगी प्रक्रियेशी जोडले गेले आहेत. तसेच, जुन्या इमारतींनी कूल रूफ तंत्रज्ञान वापरल्यास त्यांना कर सवलत देण्याची तरतूदही यात आहे.
Source link
‘कूल रूफ' उपनियमांसाठी राज्य शासनाचा 10 लाखांचा पुरस्कार:अमरावती मनपाच्या शिरपेचात रोवला मानाचा तुरा