![]()
‘जगाचा पोशिंदा’ म्हणून ओळखला जाणारा शेतकरी आज स्वतःच्या अस्तित्वासाठी झगडताना दिसत आहे. वाढता खर्च, घटते उत्पन्न आणि अनिश्चिततेचे सावट या तिहेरी फटक्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर रासायनिक खते तयार करण्यासाठी ल
.
पुरवठा साखळी विस्कळीत, आयातीवर परिणाम रासायनिक खतांच्या निर्मितीसाठी नायट्रोजन, अमोनिया, पोटॅश, सल्फर आणि फॉस्फरिक ॲसिड या महत्त्वाच्या घटकांची आवश्यकता असते. भारतातील बहुतांश घटक आयात करावे लागतात. युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत झाल्याने युरिया, अमोनिया आणि सल्फरचे दर गगनाला भिडले आहेत. सध्या प्रमुख खतांच्या दरात दीड ते दोन हजार रुपयांपर्यंत वाढ झाल्याने “शेती करायची की नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.
लिंकिंगचा जाच आणि मजुरीचा फटका शेतमालाला हमीभाव मिळत नसतानाच खत विक्रीत ‘लिंकिंग’ची सक्ती ही आणखी एक डोकेदुखी ठरली आहे. आवश्यक खत घेण्यासाठी व्यापाऱ्यांकडून इतर अनावश्यक वस्तू घेण्याची सक्ती केली जात आहे. खत दरवाढीसोबतच मजुरीचे दरही प्रचंड वाढले आहेत, मात्र त्या तुलनेत उत्पन्न मिळत नसल्याने तरुण पिढी शेतीपासून दूर जात असल्याची चिंता व्यक्त होत आहे. देशात युरियाची मागणी ३५० लाख टन असून उत्पादन ३००.६७ लाख टन आहे. उर्वरित गरज आयातीतून भागवली जाते. डीएपीची मागणी ९२० लाख टन असून उत्पादन केवळ ३३.९१ लाख टन आहे. ही मोठी दरी आयातीवर अवलंबून असल्याने जागतिक दरांचा फटका भारतीय शेतकऱ्यांना बसत आहे.रासायनिक खते तयार करण्यासाठी लागणाऱ्या विविध घटकांचे जागतिक दर १७ ते ६०० टक्क्यांनी वाढले आहेत.
शेतीमध्ये अनावश्यक खर्च ^मागील १० वर्षांपासून सातत्याने औषध व खते यांच्या दरात वाढ होत आहे. त्यामुळे शेतीमध्ये अनावश्यक खर्च होत असल्याने शेती करणे अवघड झाले आहे. शासनाने यावर निर्णय घेऊन दर वाढीवर नियंत्रण ठेवले पाहिजे. – अशपाक काझी, शेतकरी
‘लिंकिंग’च्या नावाखाली शेतकऱ्यांची लूट आधीच वाढीव दरामुळे संकटात असलेल्या शेतकऱ्यांची खत विक्री केंद्रांवर अडवणूक केली जात आहे. एक गोणी खत हवे असल्यास त्यासोबत अनावश्यक कीटकनाशके किंवा इतर उत्पादने घेण्याची सक्ती केली जाते. यामुळे शेतकऱ्यांवर अतिरिक्त आर्थिक भार पडत असून प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.