![]()
‘पुणे ॲग्री हॅकॅथॉन-2026’ या स्पर्धेचे उद्घाटन 15 मे रोजी सकाळी 11.30 वाजता राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते कृषी महाविद्यालय येथे होणार आहे. या स्पर्धेचा समारोप आणि बक्षीस वितरण 17 मे 2026 रोजी सक
.
या स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला असून, पोर्टलवर एकूण 1 हजार 290 अर्ज प्राप्त झाले आहेत. हे अर्ज मृदा आरोग्य आणि व्यवस्थापन, स्मार्ट जल व्यवस्थापन, शेती यांत्रिकीकरण (एआय आणि रोबोटिक्स), कृषी प्रक्रिया आणि मूल्य साखळी, अक्षय ऊर्जा आणि कृषी-कचरा व्यवस्थापन, पीक संरक्षण, हवामान-अनुकूल आणि डिजिटल शेती, प्रभावी कृषी प्रशासनासाठी एआय, तंत्रज्ञान आधारित आपत्ती व्यवस्थापन, तसेच पीक नुकसानीचे मूल्यांकन आणि भाकितासाठी एआय यांसारख्या विविध थीमसाठी आले आहेत.
प्राप्त अर्जांची प्राथमिक छाननी ज्युरी पॅनेलद्वारे करण्यात आली आहे. यामध्ये 120 नवकल्पनांची निवड प्रत्यक्ष प्रदर्शनासाठी करण्यात आली आहे. यामधून प्रत्येक प्रवर्गातून एक विजेता आणि एक उपविजेता निवडला जाईल. विजेत्यास 25 लाख रुपये आणि उपविजेत्यास 15 लाख रुपये पारितोषिक देण्यात येणार आहे.
मागील वर्षी आयोजित केलेल्या स्पर्धेचे परिणाम उत्साहवर्धक होते. एकूण निवडलेल्या 16 पैकी 12 नवकल्पना आणि उत्पादनांना कृषी विद्यापीठांकडून प्रमाणिकरण मिळाले आहे. यातील चार उत्पादनांचे व्यापारी तत्त्वावर उत्पादन सुरू झाले असून, उर्वरित उत्पादने विकसनाच्या प्रक्रियेत आहेत. तसेच, यातील चार उत्पादनांना शासनाच्या कृषी यांत्रिकीकरण योजनेत समाविष्ट करण्याबाबत कार्यवाही सुरू आहे.
या ॲग्री हॅकॅथॉनचे आयोजन नाविन्यपूर्ण कल्पना आणि उत्पादनांना आकर्षित करणे, तसेच या नवीन तंत्रज्ञानासाठी योग्य व्यासपीठ आणि व्यवस्था निर्माण करणे या उद्देशाने करण्यात येत आहे, असे जिल्हाधिकारी डुडी यांनी सांगितले.