![]()
राजर्षी शाहू शिक्षण प्रसारक मंडळ संचलित केडगाव येथील महाराणी ताराबाई कन्या विद्यालयात छत्रपती राजर्षी शाहू महाराजांची जयंती आणि सामाजिक न्याय दिन विविध समाजोपयोगी उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. सामाजिक समता, शिक्षण, स्वच्छता आणि पर्यावरण संवर
.
यानिमित्त विद्यालयाच्या वतीने केडगाव ते शाहूनगर परिसरात भव्य जनजागृती मिरवणूक काढण्यात आली. विद्यार्थिनींनी छत्रपती राजर्षी शाहू महाराज आणि मावळ्यांची वेशभूषा करून आकर्षक जिवंत देखावे सादर केले. हातामध्ये सामाजिक संदेशांचे फलक घेऊन विद्यार्थिनींनी परिसरात प्रभावी प्रबोधन केले. सामाजिक बांधिलकी जपत विद्यालयाच्या वतीने ११० गरजू विद्यार्थिनींना शालेय गणवेश, बूट व शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. तसेच इयत्ता दहावीतील गुणवंत विद्यार्थिनींचा आणि ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ मिळाल्याबद्दल प्राचार्या वासंती धुमाळ यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष रमेश बजाबा गवळी होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून व्याख्याते महेश डाळिंकर उपस्थित होते. डाळिंकर म्हणाले, शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नसून ती निर्णयक्षमता आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव करून देणारी प्रक्रिया आहे. डिजिटल युगात ऑनलाइन शिक्षणाचा सुजाण व मर्यादित वापर व्हावा. रमेश गवळी यांनी शाहू महाराजांच्या दूरदृष्टीचा गौरव करत त्यांचे विचार समाजात रुजविणे हीच खरी आदरांजली असल्याचे सांगितले.
प्रास्ताविक नामदेव वायळ यांनी, पाहुण्यांचा परिचय संजयकुमार निक्रड यांनी, र राजश्री पालवे यांनी शाहू महाराजांच्या जीवनकार्याचा परिचय करून दिला. याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष भास्कर जासूद, सचिव बबन कोतकर यांच्यासह अनेक पदाधिकारी, नगरसेविका वर्षा काकडे, मुख्याध्यापिका रेणुका म्हस्के उपस्थित होते. सूत्रसंचालन समृद्धी लटके व छाया सुंबे यांनी, तर आभार प्राचार्या वासंती धुमाळ यांनी मानले.