Headlines

दिव्य मराठी प्रयोग:घरी बनवलेला शुद्ध खवा 350 रुपये किलो, बाजारात 260 रुपयांचा भाव; ग्राहकांनो तुम्हीच ठरवा बाजारात मिळणारा खवा शुद्ध की भेसळयुक्त‎


अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यभरात भेसळखोरांविरुद्ध कडक मोहीम उघडली आहे. शिर्डीत दोन दिवसांपूर्वी ६०० निकृष्ट पेढा अन्न व औषध प्रशासनाने नष्ट केला. त्यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणात निकृष्ट खव्यापासून बनवलेल्या पेढ्यांची सर्रास

.

या पार्श्वभूमीवर ‘दिव्य मराठी’ने अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यातील इतर बाजारपेठांचा आढावा घेतला. तिथे सर्रास २६० ते २७० रुपये किलो दराने खवा उपलब्ध असल्याचे दिसले. जर १ किलो शुद्ध खवा बनवायला (मजुरी वगळता) ३५० रुपये खर्च येत असेल, तर बाजारात यापेक्षा स्वस्त दराने मिळणारा खवा नेमका कशापासून बनवला? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

‘दिव्य मराठी’ने ४५ रुपये प्रति लिटर दराने गाईचे दूध खरेदी केले. त्यापासून विनाभेसळ खवा तयार करण्यासाठी किती खर्च येतो, याचे लाईव्ह प्रात्यक्षिक केले. त्यातून वास्तव समोर आले. यापेक्षाही स्वस्त अर्थात ३५ रुपये प्रतिलिटर दराने दूध खरेदी करून इंधन, नफा व वाहतूक खर्च जोडला तरी, २६० रुपये किलो दराने विक्री करणे परवडणारा नाही.

भेसळीचे गुजरात व कर्नाटक कनेक्शन वांरवार उघड

१) नोव्हेंबर २०२१ : ट्रॅव्हल्सद्वारे गुजरातहून आणलेला १३०० किलो भेसळयुक्त खवा अहिल्यानगरमध्ये जप्त. २) ऑक्टोबर २०२३ : छत्रपती संभाजीनगर येथे वेदांतनगर पोलिसांनी १८० किलो खवा जप्त केला. हा खवा अहमदाबाद येथून आणला गेला होता. ३) सप्टेंबर २०२३ : अहमदाबाद येथून बसने महाराष्ट्रात विक्रिसाठी आणलेला ५ हजार ३४० किलो खवा जप्त केला होता. ४) ऑक्टोबर २०२४ : ३५०० किलो खवा कर्नाटक राज्यातून अमरावतीत आणल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने जप्त केला. ५) शिर्डी : २४ जून २०२६ रोजी ६०० किलो पेढा जप्त करण्यात आला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *