Headlines

‘एक गाव, एक वडाचे झाड’ मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद:छावा प्रतिष्ठानच्या वतीने‎महिलांचा विशेष सन्मान‎




पर्यावरण संवर्धन आणि वृक्षसंवर्धनाचा संदेश समाजापर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी छावा प्रतिष्ठानच्या वतीने राबवण्यात आलेल्या ‘एक गाव, एक वडाचे झाड’ या अभिनव उपक्रमाला शेळगाव (आर) येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. या उपक्रमाअंतर्गत गेल्या वर्षी गावातील सदस्यांना वडाची रोपे वाटप करण्यात आली होती. केवळ वृक्षारोपण न करता त्या रोपांचे संगोपन करण्यावर भर देण्यात आला होता. याला सकारात्मक प्रतिसाद देत गावातील महिलांनी ही रोपे आपल्या लेकराप्रमाणे जपली, त्यांना नियमित पाणी दिले, संरक्षण केले आणि वर्षभर अथक परिश्रम घेऊन त्यांचे संगोपन केले. महिलांच्या या प्रयत्नांचे आज सुंदर फळ दिसून येत आहे. गेल्या वर्षी लावलेले वडाचे छोटेसे रोपटे आता एका हिरव्यागार, सशक्त आणि दिमाखदार झाडात रूपांतरित झाले आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शेळगाव (आर)च्या प्रांगणात हे झाड आज पर्यावरण संवर्धनाचे प्रतीक म्हणून डौलाने उभे आहे. या झाडांमुळे शाळेच्या परिसराचे सौंदर्य वाढले असून भविष्यात विद्यार्थ्यांना सावली, शुद्ध हवा आणि पर्यावरणाविषयी प्रेरणा मिळणार आहे. छावा प्रतिष्ठानच्या वतीने महिलांचा विशेष सन्मान महिलांनी दाखविलेल्या या कौतुकास्पद, पर्यावरणपूरक आणि समाजासाठी आदर्शवत कार्याची दखल घेत छावा प्रतिष्ठानच्या वतीने त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. दि. २८ जून २०२६ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शेळगाव (आर) येथे आयोजित कार्यक्रमात छावा प्रतिष्ठान शेळगाव (आर)चे अध्यक्ष नितेश गायकवाड तसेच सौ. सोनाली रामेश्वर गायकवाड यांच्या हस्ते संबंधित महिलांना प्रोत्साहनपर बक्षीस देऊन गौरविण्यात आले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *