![]()
तालुक्यातील कोळेवाडी येथे एका विवाहित महिलेने आपल्या दीड वर्षाच्या निष्पाप मुलाला फाशी देऊन स्वतःही गळफास घेत जीवन संपवल्याची काळीज हेलावून टाकणारी घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. आशा सूर्यभान आंबेकर ( ३१) आणि त्यांचा दीड वर्षाचा मुलगा शिवांश अशी मृत
.
घटनेची माहिती मिळताच राहुरी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी तातडीने सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. पोलिस कॉन्स्टेबल रामनाथ सानप व इतर कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.
वाद मिटल्याने वर्षभरानंतर सासरी परतली होती आशा
मृत आशा आंबेकर यांचा विवाह तीन वर्षांपूर्वी झाला होता. मात्र, काही घरगुती वाद आणि कलहामुळे त्या गेल्या एक वर्षापासून सासर सोडून संगमनेर येथे आपल्या माहेरी राहत होत्या. अवघ्या ४ ते ५ दिवसांपूर्वीच त्या कोळेवाडी येथे सासरी परत आल्या होत्या. सासरी परतल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच त्यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले? याबाबत परिसरात विविध चर्चा सुरू आहेत.