Headlines

नगरमध्ये वटपौर्णिमेला परंपरेसोबतच पर्यावरणाचेही संवर्धन‎:महापालिकेने दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश, महिलांना मोफत रोपांचे केले वाटप



भारतीय संस्कृतीतील वृक्षपूजनाची परंपरा आणि पर्यावरण संवर्धनाची आधुनिक गरज यांचा संगम घडवत साई द्वारका सेवा ट्रस्ट व अहिल्यानगर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने, उपमहापौर अॅड. धनंजय जाधव यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या ‘पालकमंत्री ग्रीन

.

उपमहापौर जाधव यांनी ग्रीन सिटी’ ही केवळ एक योजना नसून प्रत्येक नागरिकाचा सहभाग असलेली सामाजिक लोकचळवळ असल्याचे सांगितले. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येक कुटुंबाने किमान एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन त्यांनी केले. आज लावलेले प्रत्येक रोप उद्याच्या पिढ्यांना शुद्ध हवा, स्वच्छ पर्यावरण आणि समृद्ध जीवन देईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

माजी नगरसेविका सुप्रिया धनंजय जाधव यांनी वटसावित्री पौर्णिमेचे धार्मिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणीय महत्त्व अधोरेखित केले. भारतीय संस्कृतीत वडाच्या वृक्षाला दीर्घायुष्य, समृद्धी आणि जीवनदायी शक्तीचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे परंपरेचे जतन करताना पर्यावरण संवर्धनाची जबाबदारीही प्रत्येकाने स्वीकारली पाहिजे, असे त्या म्हणाल्या. यावेळी कैलास दिघे, हर्षल आगळे, अशोक कुटे, ॲड. दिनानाथ जाधव, राहुल मुथा, सोनू बोरुडे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अमोल बागुल यांनी केले तर उपस्थितांचे आभार हर्षल आगळे यांनी मानले. वटसावित्रीच्या निमित्ताने श्रद्धा, संस्कृती आणि पर्यावरण संवर्धनाचा त्रिवेणी संगम घडविणाऱ्या या उपक्रमाने ‘एक रोप. एक जबाबदारी एक हरित भविष्य’ हा संदेश प्रभावीपणे समाजापर्यंत पोहोचवण्यात आला.

धार्मिक परंपरेसोबत पर्यावरणीय जबाबदारीची गरज माजी नगरसेविका सुप्रिया धनंजय जाधव यांनी वटसावित्री पौर्णिमेचे धार्मिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणीय महत्त्व अधोरेखित केले. त्या म्हणाल्या, “भारतीय संस्कृतीत वडाच्या वृक्षाला दीर्घायुष्य, समृद्धी आणि जीवनदायी ऑक्सिजन देणारी शक्ती मानले जाते. त्यामुळे केवळ परंपरेचे जतन करून चालणार नाही, तर पर्यावरण संवर्धनाची प्रत्यक्ष जबाबदारीही आपल्या सर्वांना स्वीकारावी लागेल.”वटपौर्णिमेच्या निमित्ताने श्रद्धा, संस्कृती आणि निसर्ग रक्षणाचा त्रिवेणी संगम साधत ‘एक रोप, एक जबाबदारी, एक हरित भविष्य’ हा अत्यंत प्रभावी संदेश या उपक्रमाद्वारे समाजापर्यंत पोहोचवण्यात आला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *