![]()
पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे चार वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याच्या धक्कादायक घटनेचा अखिल भारतीय ब्राम्हण महासंघ, करमाळा यांच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला आहे. या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्यात याव
.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, संबंधित बालिका उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी आपल्या आजी-आजोबांकडे आली असताना ती बेपत्ता झाली होती. त्यानंतर तिचा मृतदेह गावातीलच एका गोठ्यात आढळून आला. या अमानुष घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका ६५ वर्षीय संशयितास अटक केली असून भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यावेळी विविध मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाने या घटनेला अमानुष, क्रूर आणि मानवतेला काळिमा फासणारी घटना संबोधत तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. पीडित बालिकेला तातडीने न्याय मिळावा, आरोपीला कायद्यानुसार कठोरात कठोर शिक्षा व्हावी, तसेच पीडित कुटुंबीयांना मानसिक आधार व आवश्यक कायदेशीर संरक्षण मिळावे.
मानवतेला काळिमा फासणारी घटना