![]()
उजनी धरणाचे पाणी माळरानावरील शेतकऱ्यांना देण्याच्या उद्देशाने आष्टी उपसा सिंचन योजना राबवण्यात आली. या योजनेला २०- ३० वर्षे पूर्ण झालेली आहेत. मात्र, मोहोळ तालुक्यातील तेलंगवाडी येथील आष्टी उपसा सिंचन योजना डावा कालवा १ ते ७ येथे कॅनलला मोठी गळती लागल्याने लाखो लिटर पाणी वाया जात आहे. मागील अनेक वर्षांपासून सदर गळतीकडे पाटबंधारे विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत असून त्वरित कॅनलला लागलेली गळती बंद करून दिलासा द्यावा, अशी तीव्र मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. आष्टी उपसा सिंचन योजनेतील १ ते ७ किलोमीटर दरम्यानचे काम अपूर्ण असून झालेले काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहे. त्यामुळे समाधान बबन घोलप (गट क्र. १२९), बबन घोलप (गट क्र. १२८/१), पांडुरंग घोलप (गट क्र. १२८/२), राजाराम घोलप (गट क्र. १२७) आणि हरिदास घोलप (गट क्र. १२६) यांच्या किमान ३ ते ४ एकर क्षेत्रात पाण्याच्या लिकेजमुळे प्रत्येक आवर्तनाला मोठी गळती होते. विचित्र बाब म्हणजे, साधारणपणे ७-८ वर्षांपासून या क्षेत्रातील पाणीगळतीमुळे २ विहिरी गाळाने पूर्णपणे बुजल्या आहेत, तर २ बोअरही बुजले आहेत. शेतात पाणी साचल्याने विजेचे खांब पडले असून तारा तुटून वीजपुरवठा खंडित झाला आहे. या क्षेत्रातील ६० आर डाळिंब बाग, ८० आर ऊस, मका व इतर पिकांचे सध्या अतोनात नुकसान झाले आहे. यासोबतच ७०० ते ८०० फूट सर्व्हिस केबल जळाली असून शेतकऱ्यांवर प्रचंड आर्थिक संकट कोसळले आहे. या योजनेतील बाधित क्षेत्राचे अद्याप कायदेशीर वरिष्ठ कार्यालयाकडे प्रस्ताव पाठवला; २ दिवसांत पंचनामे ^तेलंगवाडी येथील आष्टी उपसा सिंचन योजना डावा कालवा १ ते ७ येथे लागलेल्या गळती संदर्भातील प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठवला आहे. त्याचबरोबर सदर गळतीचे पाणी शेतकऱ्यांच्या पिकांमध्ये जाऊन झालेल्या नुकसानीचे येणाऱ्या दोन दिवसांत पंचनामे करण्यात येतील. — शैलेश पवार, अधिकारी, आष्टी उपसा सिंचन
Source link
नुकसान:आष्टी सिंचन योजनेच्या कालव्याला गळती, तेलंगवाडी शेतशिवारात लाखो लिटर पाणी, सात किमी निकृष्ट दर्जाच्या कामाचा फटका