पारंपरिक शेतीत प्रचंड मेहनत घेऊनही अपेक्षितउत्पन्न मिळत नाही. त्यामुळे उच्चशिक्षित तरुणशेतकऱ्याने संत्रा बाग कायमठेवत त्यामध्ये मोरिंगा(शेवगा) आणि लक्ष्मीतरूयासारख्या आंतरपिकांचीलागवड केली. याप्रयोगामुळे त्यांना दरमहाकिमान मजुरी खर्च ज
.
अमरावतीजिल्ह्यातील वरूड येथील तरुण शेतकरीअजिंक्य खेरडे (३५) यांच्या प्रयाेगाचे सर्वत्रकाैतुक हाेत अाहे. अजिंक्य यांनी एमसीएपर्यंतशिक्षण घेतले.
काही वर्षे पुणे आणि नागपूर येथेखासगी क्षेत्रात नोकरी केली. त्यांच्याकडेवरूडपासून जवळच असलेल्या जरूड येथेचार एकर शेती अाहे. मागील काही वर्षांतहवामानातील बदल, बाजारातील चढ-उतारआणि संत्र्याच्या निर्यातीवरील परिणाम पाहतात्यांनी बारामतीतील शेतकऱ्यांचे प्रयोग पाहूनसंत्रा बागेत आंतरपीक घेतले. त्यांनी संत्राबागेत शेवग्याच्या ‘वलय पट्टी’ प्रकाराची तसेचलक्ष्मीतरू, बीट या वनस्पतीचीही लागवडकेली. या प्रकारात शेंगांपेक्षा पानांचे उत्पादनअधिक मिळते. मोरिंगाच्या पानांमध्ये औषधीगुणधर्म असल्याने त्याला बाजारात चांगलीमागणी आहे. वर्षातून तीन वेळा पानांचीकापणी केली जाते. ही पाने सुकवून त्यांचीपावडर तसेच टॅबलेट तयार करून विक्री केलीजाते. ऑनलाइन माध्यमातूनही या उत्पादनांचीखेरडे विक्री करत आहेत.
शेवग्याच्या पानांच्या पावडरचे अार्थिक गणित
मोरिंगाच्या बिया आणून लागवड करण्यासाठी सुरुवातीलाफक्त १५ हजारांचा खर्च आला. त्यानंतर वर्षातून तीनदा कापणीकेली जाते. सुकवलेल्या पानांची पावडर सरासरी किमान २००रुपये प्रतिकिलो विकली जाते. आंतरपीक पद्धतीतून पहिल्याकापणीत सुमारे एक क्विंटल, दुसऱ्या कापणीत १३० किलोआणि तिसऱ्या कापणीत १५० किलो उत्पादन मिळाले. चौथ्याकापणीत यापेक्षाही अधिक उत्पादनांची अपेक्षा आहे.लक्ष्मीतरू पावडरला ५ ते ७ हजार प्रतिकिलोपर्यंत दर मिळतो.विशेष म्हणजे त्यांनी ८ ते १० तरुणांनाही रोजगार दिला आहे.

आपणही शेतकरी आहात. अनोख्या प्रयोगांची संपूर्ण माहिती, छायाचित्र-व्हिडिओ आपल्या नाव व पत्त्यासह 8888840081 या व्हॉट्सअॅपवर पाठवावी. मात्र ही माहिती यापूर्वी वृत्तपत्रात, सोशल मीडियावरही प्रसिद्ध झालेली नसावी.