Headlines

पैठणला काँग्रेस पक्षाचे ‘संघटन सृजन अभियान':काँग्रेस कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी, पेढे वाटून साजरा केला जल्लोष




अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या ‘संघटन सृजन अभियान’ अंतर्गत पैठण शहर काँग्रेस कमिटी अध्यक्षपदी नगरसेवक हसनोद्दीन कट्यारे यांची फेरनिवड करण्यात आली आहे. पक्षश्रेष्ठींनी ही महत्त्वाची जबाबदारी जाहीर करताच काँग्रेस कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी आणि पेढे वाटून जल्लोष साजरा केला. पक्ष संघटना अधिक बळकट व गतिमान करण्याच्या उद्देशाने सध्या राज्यभर संघटन सृजन अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत तालुका व शहर स्तरावर इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या. त्यानंतर जिल्हा काँग्रेस कमिटीकडून प्राप्त झालेल्या अहवालाच्या आधारे पक्षाप्रती निष्ठा, मजबूत संघटनात्मक कौशल्य आणि स्थानिक पातळीवरील दांडगा जनसंपर्क यांचा विचार करून हसनोद्दीन कट्यारे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. फेरनिवडीबद्दल खासदार डॉ. कल्याण काळे, जिल्हाध्यक्ष सय्यद अकरम, कमाल फारोकी, इब्राहिम पठाण, जगन्नाथ काळे, अनिल पटेल, दिलीप भोसले, रमेश मुळे, किशोर दसपुते, शेखर देशमुख, रवींद्र आम्ले, युनुस पठाण, गणेश गायकवाड, संभाजी काटे, अंबादास ढवळे, मुक्तार पठाण, पाशाभाई मंजन, महेश पवार आणि बाळू नजन यांनी अभिनंदन केले. पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने माझ्यावर पुन्हा एकदा जो विश्वास दाखवला आहे, तो सार्थ ठरविण्यासाठी मी पूर्ण क्षमतेने काम करेन. संघटन सृजन अभियान प्रभावीपणे राबवून प्रत्येक प्रभागात पक्षाची ताकद वाढविणार आहे. नागरिकांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यास सर्वोच्च प्राधान्य राहील, असा विश्वास अध्यक्ष कट्यारे यांनी व्यक्त केला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *