![]()
ओझर येथील संजय मारुती मंडलिक (४६) यांचा दुचाकी अपघातात गंभीर जखमी हाेऊन ‘ब्रेन डेड’ असा मृत्यू झाला. या या दुःखाच्या प्रसंगातही त्यांच्या रोशन (२०) आणि भूषण (१६), या मुलंनी आपल्या वडिलांचे
अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. यामुळे ५ जणांना नवीन जीवन मिळाले आहे. समुपदेशक डॉ. संजय रकिबे यांनी अवयवदानाचे महत्त्व सांगितल्यानंतर संजय मंडलिक यांचे यकृत, दोन डोळे आणि त्वचा दान करण्यात आली. रुग्णालय कर्मचाऱ्यांनी मानवी साखळी तयार करून त्यांच्या पार्थिवाला भावपूर्ण निरोप दिला. ‘ग्रीन कॉरिडॉर’द्वारे अवयव पाठवले पुण्याला
‘ग्रीन कॉरिडॉर’ तयार करत लिव्हर पुण्याच्या रुग्णालयांत पाठवले. तर दाेन डाेळे मविप्रच्या नेत्रपेढीत आणि त्वचा डॉ. नेहते रुग्णालय त्वचापेढीत दान करण्यात आली. खैरे व मंडलिक कुटुंबांचा अवयवदानात पुढाकार ओझर येथील डॉ. विजयालक्ष्मी विनायक खैरे व संजय मारुती मंडलिक यांच्या निधनानंतर खैरे कुटुंबीय व मंडलिक कुटुंबीयांनी अवयवदान करण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे ओझरमध्ये अवयवदानाबाबत जनजागृती होत अाहे. ओझरकरांच्या या पुढाकारामुळे अनेकांना दीर्घायुष्य मिळणार असल्याचा भावनाही या दोन्ही परिवारातील नातेवाईकांकडून व्यक्त केल्या जात आहे.
Source link
पित्याच्या अपघाती मृत्यूनंतर मुलांचा अवयवदानाचा निर्णय:ओझरच्या मंडलिक कुटुंबाचा समाजापुढे आदर्श