Headlines

चांदवड तालुक्यात 42 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत स्थान:स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात विद्यार्थी व गुणवंत पालकांचा विशेष सन्मान‎




तालुक्यातील ग्रामीण भागातील ४२ विद्यार्थ्यांनी जिल्ह्याच्या ग्रामीण शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत स्थान मिळवले. यामध्ये इयत्ता चौथीचे ३० आणि इयत्ता सातवीचे १२ विद्यार्थी आहेत. या गुणवंत विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा स्वातंत्र्य दिनाच्या औचित्याने पंचायत समितीत विशेष सन्मान करण्यात आला. तीन वर्षांपासून गटविकास अधिकारी मच्छिंद्र साबळे यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली तसेच गटशिक्षणाधिकारी शितल तावडे यांच्या समन्वयातून ‘मिशन शिष्यवृत्ती व नवोदय’ उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत शिक्षकांसाठी शिक्षण विभागाच्या माध्यमातून वेळोवेळी मोफत मार्गदर्शन व प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आल्या. त्याचा सकारात्मक परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर दिसून आला. १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त पंचायत समितीच्या आवारात झालेल्या ध्वजारोहण कार्यक्रमासाठी गुणवंत विद्यार्थी व त्यांच्या पालकांना विशेष निमंत्रित करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांच्या हस्ते ध्वजस्तंभाचे पूजन करण्यात आले. पंचायत समितीचे प्रशासक मच्छिंद्र साबळे यांच्या समवेत विद्यार्थ्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीतील सर्व ४२ विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, साने गुरुजी लिखित ‘श्यामची आई’ पुस्तक तसेच शिष्यवृत्ती परीक्षेसाठी उपयुक्त पुस्तके देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल पालकांचेही अभिनंदन करण्यात आले. या विद्यार्थ्यांना पुढील तीन वर्षे इयत्तेनुसार अनुक्रमे दरमहा ५०० व ७५० रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे. ग्रामीण विद्यार्थ्यांचे हे यश शिक्षकांचे मार्गदर्शन, पालकांचे पाठबळ आणि विद्यार्थ्यांच्या परिश्रमाचे फलित असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *