![]()
रुग्ण संभाजीनगरमधील खासगी रुग्णालयातला आणि क्लेम मंजूर झाला बनावट कागदपत्रांच्या आधारे मुंबईतील एका प्रतिष्ठित रुग्णालयात. ‘दिव्य मराठी’च्या हाती लागलेला हा धक्कादायक प्रकार आहे महात्मा फुले जनआरोग्य योजनेतील. शासनाच्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेत बोगस रुग्ण दाखवून अनुदान लाटल्याच्या घोटाळ्याची व्याप्ती महाराष्ट्रभर पसरली आहे. छत्रपती संभाजीनगरमधील रिजवान शेख या रुग्णाला घोटाळ्यामुळे मानसिक त्रासासह आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला. गुडघ्यावरील शस्त्रक्रियेसाठी त्याने या योजनेंतर्गत प्रस्तावाची फाइल दाखल केली होती. त्यासोबत रेशनकार्ड, आधार क्रमांक आणि मोबाइल क्रमांक यांच्या नोंदीजोडण्यात आल्या होत्या. त्या डेटाच्या आधारे बनावट रुग्णाच्या नावे मुंबईतील एका हॉस्पिटलमधून त्याच दिवशी हा क्लेम मंजूर करण्याचा प्रकार घडला. बोगस कागदपत्रे दाखवत शेख रिजवान यांच्या नावाने शस्त्रक्रियेच्या एक तास अगोदर मुंबईच्या हॉस्पिटलमध्ये क्लेम पास झाल्याचा हा पुरावा. शेवटी ऑपरेशन करावे लागले रद्द संभाजीनगरमधील रिजवान शेख एका रुग्णालयात गुडघ्याच्या शस्त्रक्रियेसाठी दाखल झाला होता. महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत या शस्त्रक्रियेसाठी अनुदान मिळावे म्हणून त्या रुग्णालयाने त्याची फाइल मंजुरीसाठी पाठवली होती. २८नोव्हेंबरला त्याच्यावर शस्त्रक्रिया होणार होती. त्याच्या १ तास आधीच त्याच्या नावाचा क्लेम त्याच दिवशी मुंबईतील एका रुग्णालयात मंजूर झाल्याचे पो र्टलवर दिसले.
Source link
म. फुले आरोग्य योजनेचा घाेटाळा:रुग्ण संभाजीनगरला दाखल, बनावट क्लेम लाटला मुंबईत, शस्त्रक्रियेच्या तासभर आधी झाले उघड, भरावे लागले 82 हजार