![]()
सामाजिक संस्था समाजाच्या उन्नतीसाठी कार्य करतात. महिला संघटनांचे योगदान मोठे आहे. विशेषत: आर्थिकदृष्ट्या कमकुवत बहिणींना महिला संघटनांनी सहकार्य करून, समाजातील एका वर्गाला प्रगतीकडे घेऊन जावे, असे मार्गदर्शन अखिल भारतीय माहेश्वरी महिला संगठनच्या अध्यक्षा ज्योती राठी यांनी केले. विदर्भ प्रादेशिक माहेश्वरी महिला संगठनच्या एकादश सत्राचा शानदार शुभारंभ नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला. दशम सत्राची समाप्ती आणि नव्या कार्यकारिणीचे पदग्रहण अखिल भारतीय माहेश्वरी महिला संगठनच्या अध्यक्षा ज्योती राठी व मध्यांचल संयुक्त मंत्री भारती राठी यांच्या मार्गदर्शनात व सुषमा बंग व नीलिमा मंत्री यांच्या नेतृत्वात पार पडला. यावेळी त्या मार्गदर्शन करीत होत्या.ज्योती राठी पुढे म्हणाल्या, पदाधिकाऱ्यांना कार्यकर्ता समजावे, निवृत्तमान व वर्तमान यांचा सन्मान व सहयोग करावा, संगठनाची बाब बाहेर जाऊ नये, सकारात्मक राहून आव्हानांना तोंड द्यावे असेही त्यांनी सांगितले. या कार्यक्रमात अ. भा. माहेश्वरी संगठनचे माजी सभापती श्याम सोनी, मध्यांचलचे दिनेश राठी, प्रदेशाध्यक्ष दामोदर सारडा, युवा उपाध्यक्ष हिमांशू चांडक, सुरेश बंग, संजय मंत्री, पूर्व अध्यक्ष तारा माहेश्वरी, मीना सावल, ज्योति बाहेती, उषा करवा उपस्थित होते. प्रकल्प प्रमुख सुनंदा लढ्ढा, प्रदेश कोषाध्यक्ष प्रेमा बंग, संगठन मंत्री कल्पना भूतडा, प्रचार मंत्री सुनीता मल्ल, प्रगति माहेश्वरी आशा मुंदडा यांनी पूजनाने सभा सुरू केली. यावेळी प्रदेशाध्यक्षा सुषमांनी मार्गदर्शन केले. ३ वर्षे यशस्वी गेली, सर्वांनी निष्ठेने जबाबदाऱ्या पार पाडल्या, यामुळे समितीला कोहिनूर कॅटेगरी मिळाली असे सांगितले.नीलिमा मंत्रींनी आशीर्वाद व सहयोगाची गरज सांगितली, विश्वासावर खरा उतरण्याचा प्रयत्न करेन असे म्हटले. पूर्व अध्यक्षांचे स्वागत झाले, उमरेड तहसीलने महेश वंदना सादर केली. संचालन रूपा चांडक, मीनू भट्टड, निशी सावल, रूपा चांडक, पूर्णिमा काबरा यांनी व आभार पूजा राठींनी मानलेत. कार्यक्रमाला मोठ्या संख्येत महिला सदस्यांची उपस्थिती होती. द्वित्तीय सत्रात रंगला पदग्रहण सोहळा भोजनानंतर द्वितीय सत्रात अध्यक्षा नीलिमा मंत्री (यवतमाळ), सचिव कल्पना चांडक (कारंजा), कोषाध्यक्षा विद्या लढ्ढा (नागपूर), संगठन मंत्री संध्या केला (अमरावती), प्रचारमंत्री शिल्पा चांडक (अकोला), उपाध्यक्षा कल्पना भूतडा, लक्ष्मी भट्टड, सुनीता मल्ल, नीना भंडारी, सहसचिव मीनू मोहता, पुष्पा मुंदडा, राधिका मुंदडा, सुनंदा लढ्ढा, नारी संदेश संपादिका शोभा गट्टाणी, ट्रस्ट संयोजिका प्रेमा बंग व ११ जिल्हा अध्यक्ष-सचिवांनी पदग्रहण केले.
Source link
महिला संघटनांनी आर्थिकदृष्ट्या दुर्बल बहिणींना सहकार्य करावे- ज्योती राठी:विदर्भ प्रादेशिक माहेश्वरी महिला संगठनचा पदग्रहण साेहळा उत्साहात साजरा