Headlines

‘मांगी’चे पाणी जामखेडला देण्यास शेतकऱ्यांचा विरोध:आज रास्ता रोको, अन्यथा मांगी तलावातच सर्व शेतकरी जलसमाधी घेऊ..




करमाळा तालुक्यातील दुष्काळी भागासाठी जीवनदायी ठरलेल्या मांगी मध्यम प्रकल्पातील पाणी जामखेड तालुक्यातील हळगाव येथील कृषी विद्यालयाला देण्याचा प्रस्ताव समोर आल्यानंतर मांगीसह संपूर्ण तलाव लाभक्षेत्रातील शेतकरी, ग्रामस्थ आणि शेतकरी व प्रकल्पग्रस्तांत नाराजी पसरली आहे. या निर्णयाविरोधात सोमवारी (दि. २२)अहिल्यानगर-सोलापू र या महामार्गावरील मांगी येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती आंदोलनकर्त्यांनी दिली. मांगी तलावाच्या पाण्याबाबत कोणताही निर्णय घेताना लाभक्षेत्रातील शेतकरी, ग्रामस्थ यपंना विश्वासात घेतले नाही. ^मांगी तलावाच्या पाण्यावर मांगी पंचक्रोशीतील शेतकऱ्यांचा पूर्णपणे हक्क आहे. आम्ही मांगी तलावातील पाणी इतरत्र नेऊ देणार नाही. आमची मागणी मान्य नाही झाल्यास आम्ही मांगी पंचक्रोशीतील शेतकरी तलावातच जलसमाधी घेणार आहे. आमच्या हक्काचे पाणी जामखेडला नेणार असाल तर येथून पुढे मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही. अजय बागल, रयत क्रांती शेतकरी संघटना युवक प्रदेश उपाध्यक्ष



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *