Headlines

मारहाण करणाऱ्यांची नावे पँटवर लिहून आत्महत्या:तर बारावीच्या विद्यार्थ्यांचा वादातून गळफास‎




विवाहाच्या पूर्व संध्येला डीजेच्या तालावर नाचताना झालेल्या वादातून आंबीलहोळ येथे शेतात तरुणाने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. तर जामनेर बस स्थानक परिसरात विद्यार्थ्यांशी वाद झाल्याच्या कारणावरून बारावीतील विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. बुधवारी रात्री जामनेर तालुक्यात या दोन्ही घटना घडल्या. वरखेडी येथील रहिवासी असलेला पवन मिस्त्री याच्या मामाचे गाव आंबीलहोळ आहे. आंबील होळ येथील एका लग्नासाठी मातापित्यासह पवन आंबीलहोळला आलेला होता. लग्नाच्या पूर्वसंध्येला रात्री डी.जे. लावण्यात आला होता. यावेळी पवनचे नाचण्यावरून काही तरुणांसोबत वाद झाले. कुटुंबीयांसह इतर नातेवाईकांनी संवाद घालून वाद मिटविले. पॅन्टवर लिहिली नावे पवन मिस्त्री यांनी आत्महत्यापूर्वी ज्यांनी आपल्याला मारहाण केलेली आहे अशा काहींची नावे आपल्या पांढऱ्या पॅन्टवर लिहून ठेवले आहेत. हा प्रकार सकाळी उघडकीस आला. या प्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. यावेळी मृताच्या नातेवाईकांची रूग्णालयात गर्दी केली होती.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *