Headlines

महिला डॉक्टरला मारहाण भोवली:एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक रमेश म्हात्रेला 4 दिवसांची कोठडी; अटक टाळण्याचा प्रयत्न फसला




सत्ता, पद आणि पैशाच्या गुर्मीत कायद्याला खिशात घेऊन फिरणाऱ्या लोकप्रतिनिधींना न्यायालयाने पुन्हा एकदा त्यांची जागा दाखवून दिली आहे. एका महिला डॉक्टरवर हात उचलणे कल्याण-डोंबिवलीतील शिवसेनेचे (शिंदे गट) वादग्रस्तनगरसेवक रमेश म्हात्रे यांना भलतेच महागात पडले आहे. याप्रकरणी न्यायालयाने म्हात्रे यांना थेट 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्याने राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ माजली आहे. डोंबिवलीतील एका नामांकित रुग्णालयात एका रुग्णाच्या उपचारावरून वाद झाला होता. लोकप्रतिनिधी असल्याच्या तोऱ्यात रमेश म्हात्रे यांनी तिथे कर्तव्यावर असलेल्या महिला डॉक्टरशी केवळ हुज्जतच घातली नाही, तर थेट मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. ‘सगळ्यांचे रक्षक’ म्हणवून घेणारेच जर महिला डॉक्टरांवर असे हात उचलणार असतील, तर वैद्यकीय क्षेत्रातील महिलांनी सुरक्षित कसे राहायचे? हा गंभीर प्रश्न या निमित्ताने पुन्हा ऐरणीवर आला. छातीत कळ आणि थेट जेलाची हवा! डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात महिला डॉक्टरला मारहाण केल्यानंतर माजी नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी अटक टाळण्यासाठी जुनाच ‘राजकीय पॅटर्न’ वापरण्याचा प्रयत्न केला. पोलिसांचा ससेमिरा मागे लागताच म्हात्रे यांच्या छातीत अचानक दुखू लागले आणि ते स्वतःच छत्रपती प्रमिलाराजे (CPR) रुग्णालयात दाखल झाले. पण हा डाव उलटला! डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना ‘फिट’ घोषित करताच पोलिसांनी म्हात्रेंना न्यायालयासमोर उभे केले. न्यायालयाने कोणताही राजकीय मुलाहिजा न ठेवता म्हात्रेंची १३ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली. जो नेता कालपर्यंत डॉक्टरांवर हात उचलत होता, त्याला आता स्वतःचे आरोग्य तपासण्यासाठीही पोलिसांच्या परवानगीची वाट पाहावी लागत आहे. न्यायालयाचा दणका: ‘नो व्हीआयपी ट्रिटमेंट!’ महिला डॉक्टरने धैर्याने पुढे येत पोलिसांत तक्रार दाखल केली. सुरुवातीला राजकीय दबावामुळे कारवाई संथ होईल अशी भीती व्यक्त केली जात होती, पण कायद्याचे हात म्हात्रेंच्या गळ्यापर्यंत पोहोचलेच. पोलिसांनी न्यायालयात भक्कम बाजू मांडत, या गुन्ह्याची पाळेमुळे आणि म्हात्रेंचा नेमका हेतू तपासण्यासाठी कोठडीची मागणी केली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने रमेश म्हात्रेंची रवानगी 4 दिवसांच्या पोलीस कोठडीत केली आहे. आता पुढचे चार दिवस म्हात्रेंची रवानगी पांढरपेशा एसी केबिनमधून थेट पोलीस कोठडीतील कडक जमिनीवर झाली आहे. डॉक्टर संघटना आक्रमक: “आता माघार नाही!” या घटनेनंतर वैद्यकीय क्षेत्रातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. आयएमए (IMA) आणि स्थानिक डॉक्टरांच्या संघटनांनी या कारवाईचे स्वागत केले असले, तरी अशा घटनांना आळा घालण्यासाठी कठोर कायद्याची अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे. “रुग्णांचे प्राण वाचवणाऱ्या डॉक्टरांवर, त्यातही महिला डॉक्टरांवर असे भ्याड हल्ले होत असतील तर आम्ही काम कसे करणार? रमेश म्हात्रेंना झालेली अटक हा केवळ एक धडा नाही, तर अशा प्रवृत्तींना मिळालेला कडक इशारा आहे.” पुरुषार्थाची व्याख्या बदलणारे ‘ते’ कृत्य! महिला डॉक्टरांवर हात उचलणाऱ्या लोकप्रतिनिधींची पाठराखण करणाऱ्या सत्ताधाऱ्यांना आदित्य ठाकरेंनी आरसा दाखवला आहे. रुग्णालयात घुसून महिलांना मारहाण करायची आणि कायद्याचा फास आवळू लागताच स्वतःच रुग्णालयातील बेडवर जाऊन सलाईन लावून बसायचे, ही कसली मर्दानगी? असा संतप्त सवाल त्यांनी केला. ज्या हातांनी रुग्णांचे प्राण वाचवले, त्याच हातांवर सत्तेच्या गुर्मीत वार करणाऱ्यांना ‘थर्ड डिग्री’ मिळण्याऐवजी व्हीआयपी ट्रिटमेंट दिली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. गृहमंत्र्यांची ‘लाचारी’ की ‘अगतिकता’? या संपूर्ण प्रकरणात आदित्य ठाकरेंचा सर्वात मोठा आणि थेट प्रहार होता तो गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर. विरोधकांच्या मागे पोलिसांचा ससेमिरा लावणारे गृहमंत्री आपल्याच मित्रपक्षाच्या गुंड प्रवृत्तीच्या नेत्यांसमोर इतके मवाळ का झाले? फडणवीसांचे हात नक्की कोणी बांधले आहेत? असे सवाल उपस्थित करत ठाकरेंनी राज्यातील कायदा-सुव्यवस्थेच्या चिंधड्या उडाल्याचे अधोरेखित केले. स्थानिक खासदारांच्या वरदहस्तामुळेच पोलिसांवर दबाव आणला जात असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. ‘पळपुटेपणाचे’ राजकारण आणि सलाईन पॅटर्न उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना आदित्य ठाकरेंनी उपरोधाचा अचूक वापर केला. भ्रष्टाचाराच्या आणि गुंडशाहीच्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागू नयेत, म्हणूनच मुख्यमंत्री आधीच रुग्णालयात जाऊन सलाईन लावून बसले होते, असा टोला त्यांनी लगावला. हा केवळ उपचार नसून जनतेच्या प्रश्नांपासून पळ काढण्याचा राजकीय बनाव आहे, अशी घणाघाती टीका त्यांनी केली. देवेंद्र फडणवीस हे आपले शेवटचे विधानसभा अधिवेशन गाजवत असून, ते आता महाराष्ट्रातून गाशा गुंडाळून दिल्लीत जाण्याच्या तयारीत आहेत, म्हणूनच ते सभागृहात मराठी सोडून हिंदीत भाषणे ठोकून हायकमांडला खूश करत आहेत, अशी मिश्कील टिप्पणीही त्यांनी केली. एका नजरेत: कायद्याचा दणका आणि पुढील चक्र



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *