![]()
सोलापूर येथील माळशिरस येथे पिकअप गाडी विहिरीत कोसळून 14 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. रस्त्याच्या बाजूलाच ही विहीर होती आणि या विहिरीत पिकप गाडी कोसळून यात 14 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हा अपघात घडल्यानंतर आजूबाजूचे लोक जमा झाले असून ही गाडी विहीरीच्या बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. म्हसवड-पंढरपूर मार्गावर तांदुळवाडीजवळ हा भीषण अपघात झाल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, म्हसवड-पंढरपूर मार्गावरून सिद्धनाथांच्या दर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर काळाने घाला घातला आहे. सिद्धनाथांचं दर्शन करून गावाकडे परताना माळशिरस तालुक्यातील तांदळवाडी गावानजीक एका विहिरीत पिकप गाडी कोसळली. गाडी कोसळून भीषण अपघातात 14 जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. मृतांमध्ये महिला, लहान मुलांचा देखील समावेश आहे.
Source link
माळशिरस येथे पिकप गाडी विहिरीत कोसळून 14 जणांचा मृत्यू:विहिरीला कठडा नसल्याने भीषण अपघात, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता