![]()
उंडणगाव ग्रामपंचायतीला मुख्यमंत्री समृद्धी पंचायत अभियान मूल्यांकन समितीने नुकतीच भेट दिली. या भेटीदरम्यान समितीच्या सदस्यांनी ग्रामपंचायतीच्या वतीने गावात राबविण्यात आलेल्या विविध लोकाभिमुख विकासकामांची, स्वच्छता मोहिमेची आणि प्रशासकीय कामकाजाची पाहणी करून आढावा घेतला. मुख्यमंत्री समृद्धी पंचायत अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील ग्रामपंचायतींना अधिक सक्षम, पारदर्शक आणि विकासाभिमुख बनविण्याचा राज्य शासनाचा मानस आहे. याच अभियानाचा एक भाग म्हणून उंडणगाव ग्रामपंचायतीने केलेल्या उल्लेखनीय कामांची दखल घेत या मूल्यांकन समितीने गावाला भेट दिली. यावेळी गावातील स्वच्छता व्यवस्था, नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सोयी-सुविधा, पर्यावरण संवर्धन आणि लोकसहभागातून राबविण्यात येणारे विविध उपक्रम यावर समितीने समाधान व्यक्त केले. सहाय्यक आयुक्त, पुणे राजनंदिनी भागवत, गटविकास अधिकारी, हिंगोली दीपक सवडे, सहाय्यक अधिकारी, ठाणे रविंद्र बोरुडे, गटविकास अधिकारी रत्नाकर पगार आदींचा समितीमध्ये समावेश होता. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत, गावाच्या भौतिक विकासासोबतच ‘हरित उंडणगाव’ घडविण्याचा संकल्प यावेळी उपस्थित मान्यवरांनी व ग्रामस्थांनी व्यक्त केला. मूल्यांकन समितीने उंडणगाव ग्रामपंचायतीला भेट देत पाहणी केली. लोकसहभागातील कामे पाहून भारावले उंडणगाव ग्रामपंचायतीचे प्रशासक व सरपंच लक्ष्मण पाटील, नागेश लांडगे, पंकज जैस्वाल, ग्रामविकास अधिकारी डी. जे. बोर्डे, तानाजी सोनवणे तसेच ग्रामपंचायत कर्मचारी संजय अक्कर, रामेश्वर अनेकर आणि संबंधित विभागाचे इतर शासकीय अधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उंडणगाव ग्रामपंचायतीने प्रशासकीय शिस्त आणि लोकसहभागाच्या जोरावर आदर्श गाव निर्मितीकडे टाकलेले हे पाऊल कौतुकास्पद ठरत आहे.
Source link