Headlines

राज्याच्या 288 आमदारांकडे 316 किलो सोने:5 वर्षांत 91 किलोची वाढ, 147 किलो सोने भाजप तर 44 किलो शिंदेसेनेकडे




२८८ आमदारांकडे ५,१८३ कोटींचे ३१६ किलो सोने आहे. पैकी ४,९२४ कोटींचे २२६ किलो सोने सत्ताधारी आमदारांकडे आहे. त्यात एकट्या भाजपकडे १४७ किलो (४७%) सोने आहे. शिंदेसेनेकडे ४४ किलो (१४% ) तर राष्ट्रवादीकडे ३३ किलो (१०%) सोने आहे. विशेष म्हणजे, ९१% चांदी सत्ताधाऱ्यांकडेच आहे. त्यात ८१ % भाजप, २% शिंदेसेना तर ८ % राष्ट्रवादीच्या आमदारांकडे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वर्षभर सोने विकत न घेण्याचे आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर ‘दिव्य मराठी’ने २८८ आमदारांनी २०१९ व २०२४ च्या निवडणुकीत दिलेल्या ५७६ शपथपत्रांची पडताळणी केली तर २०१९ च्या तुलनेत २०२४ मध्ये २८८ आमदारांकडे ९१ किलो सोन्याची वाढ झाली आहे.
शिर्डी संस्थानच्या तुलनेत सत्ताधाऱ्यांतील तीन्ही पक्षांच्या आमदारांकडे ४३ % सोने देशातील सर्वात श्रीमंत देवस्थानापैकी एक असलेल्या शिर्डीच्या साईबाबा संस्थानाकडे गेल्या १०० वर्षांत ५१४ किलो सोन्याचे दान जमा झाले आहे. त्या तुलनेत राज्यातील २८८ आमदार ३१६ किलो सोन्याचे धनी आहेत. म्हणजेच एकट्या शिर्डी संस्थानाकडे असणाऱ्या एकूण सोन्याच्या तुलनेत ६१% सोने २८८ आमदारांच्या घरात चकाकते आहे. तर शिर्डी संस्थानाच्या तुलनेत भाजपकडे २८ टक्के सोने आहे. तर भाजप, शिंदेसेना, राष्ट्रवादी या सत्तेतील तीन्ही पक्षांकडे २२६ किलो सोने आहे. म्हणजेच संस्थानच्या तुलनेत ४३% सोने आहे. ५ वर्षांत विरोधकांनी जमवले दुप्पट सोने २०१९ च्या तुलनेत २०२४ मध्ये आमदारांच्या सोने-चांदीच्या साठ्यात मोठी वाढ झाली. सत्ताधारी आमदारांकडील सोने १८२.६ किलोवरून २२५.८ किलो झाले आहे. विरोधकांकडील सोने ४२.४ किलोवरून ८५.४ किलो झाले. सत्ताधाऱ्यांकडील चांदीच्या साठ्यात प्रचंड वाढ झाली आहे. ६६४.७ किलोवरून थेट १,४१४.३ किलोपर्यंत पोहोचली आहे. ही वाढ १००% पेक्षाही जास्त आहे. चांदी खरेदीतही विरोधकांच्या तुलनेत सत्ताधारी आमदारांचीच चांदी १. ७२%सोने सत्ताधारी आमदारांच्याच घरात आहे. एकूण ३१६ किलो सोन्यापैकी २२६ किलो सोने एकट्या सत्ताधारी आमदारांकडेच आहे. दान करून अर्थव्यवस्था बळकट केली पाहिजे राज्यातील तिन्ही सत्ताधारी पक्ष पंतप्रधांनाना आयडॉल मानतात. यामुळे त्यांनी नवीन सोने खरेदी न करण्याचा संकल्प तर केलाच असेल. पण इंदिरा गांधींनी ज्याप्रमाणे स्वत:कडील सोने लष्कराकडे जमा केले होते, अगदी तसेच राज्यातील सत्ताधारी आमदारांनी देशाची बिकट झालेली अर्थव्यवस्था बळकट करायची असेल तर सोने दान करावे. पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद द्यावा असे मला वाटते.-अंबादास दानवे, माजी विरोधी पक्षनेते



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *