![]()
“मानवी संवेदना कुंठित होत चाललेल्या आजच्या काळात, मोबाईलवर दीड मिनिटांच्या रिल्स पाहणाऱ्या तरुण पिढीचा मेंदू केवळ अंगठ्यात येऊन अडकला आहे. वाचन, संवाद आणि पुस्तकांच्या माध्यमातून हा मेंदू पुन्हा डोक्यात नेऊन ठेवण्याचे मोठे आव्हान आपल्यासमोर आहे. समृद
.
“जगातील सर्व क्रांत्या पुस्तकांच्या विचारांतूनच झाल्या आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळात आपल्यासमोर ब्रिटिशांचे आव्हान होते, तर आता पाश्चात्त्य मानसिकतेचे गुलाम बनवणाऱ्या कंपन्यांचे आव्हान आहे. एकत्र कुटुंब पद्धतीतील आजी-आजोबांनी नव्या पिढीच्या हाती पुस्तके देऊन त्यांना तंत्रज्ञानाच्या गुलामगिरीतून बाहेर काढले पाहिजे. आपले समर्पण प्रामाणिक असेल तर कोणतीही परिस्थिती यशाला अडसर ठरू शकत नाही,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. ज्योती कुलकर्णी यांनी केले. शिल्पा रसाळ यांनी परिचय करून दिला. डॉ. राजा ठाकूर यांनी सत्कार केला, तर राहुल तांबोळी यांनी आभार मानले.
कृती महत्त्वाची, “ॲक्शन आणि एक्सेप्टन्स’ची गरज “सध्याच्या मोटिव्हेशनल पुस्तकांच्या भ्रामक जगात केवळ पैसे कमवणे आणि ते दाखवणे यालाच यश मानले जात आहे. मात्र, भारतीय संस्कृतीत सर्वांना बरोबर घेऊन चालण्याची परंपरा आहे. त्यामुळे केवळ ‘मोटिव्हेशन’च्या मागे न धावता जीवनात “ॲक्शन’ (कृती) आणि “एक्सेप्टन्स’ (स्वीकारार्हता) या दोन गोष्टींना महत्त्व द्या. ‘रावन’ या पुस्तकाच्या माध्यमातून आपण मानवी सत्य अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडल्यामुळेच ते वाचकांना आपलेसे वाटले,” असे प्रतिपादन शरद तांदळे यांनी केले.