.


सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदार संघाची निवडणूक जाहीर झाली असून, राजकीय वर्तुळात आतापासूनच कमालीची ईर्ष्या आणि चुरस पाहण्यास मिळत आहे. या निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील संख्याबळाचे गणित पाहता सत्ताधारी भारतीय जनता पक्षाकडे (भाजप) स्पष्ट ”मॅजिक फिगर” उपलब्ध आहे. त्यामुळे भाजपकडून इच्छुकांची भाऊगर्दी झाली असतानाच, दुसरीकडे विरोधी महाविकास आघाडी आणि स्थानिक आघाड्यांनी एकत्र येऊन मोट बांधल्यास भाजपसमोर तगडे आव्हान उभे राहू शकते, अशी चिन्हे आहेत. या सर्वच नेत्यांचा आपापल्या मतदारसंघात आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील मतदारांवर मोठा प्रभाव असल्याने भाजप कोणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ घालणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राजन पाटील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत जिल्हा परिषद, महानगरपालिका, १७ नगरपालिका आणि नगरपंचायत यांचे एकूण ५६७ सदस्य मतदार असणार आहेत. पंचायत समिती सदस्यांनाही मतदान करता येईल, अशी शक्यता आहे. राजेंद्र राऊत दिलीप माने प्रशांत परिचारक
विरोधकांच्या एकजुटीवर निवडणुकीचे चित्र अवलंबून एकीकडे भाजपची बाजू कागदावर अत्यंत मजबूत दिसत असली, तरी राजकारणात ऐनवेळी होणाऱ्या घडामोडी अनपेक्षित असतात. विरोधकांनी जर या निवडणुकीत ”एकमेका सहाय्य करू” अशी भूमिका घेतली, तर लढत चुरशीची होऊ शकते. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (दोन्ही गट) आणि शिवसेना (दोन्ही गट) यांचा समावेश असलेली महाविकास आघाडी (मविआ) आणि जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधील स्थानिक आघाड्या यांनी जर अंतर्गत मतभेद बाजूला ठेवून एक सामायिक उमेदवार मैदानात उतरवला, तर निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता आहे.
आम्ही विरोधी आघाडीचा उमेदवार देणार : धोत्रे सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजपच्या विरोधात सर्व पक्षीय आघाडी करून तुल्यबळ उमेदवार दिला जाईल, अशी माहिती मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांनी दिली आहे. या निवडणुकीत भाजपकडे जरी बहुमत दिसत असले तरी मोहोळ, पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला, माळशिरस, करमाळा, माढा तालुक्यातील स्थानिक आघाड्याची मतांची बेरीज केली तर ही निवडणूक विरोधी आघाडीसुद्धा जिंकू शकते, असा दावा मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांनी केला आहे.
भाजपकडे संख्याबळाचे बळ जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांवर सध्या भाजपचे निर्विवाद वर्चस्व पाहायला मिळत आहे. सोलापूर जिल्हा परिषदेत भाजप पक्षाकडे पूर्ण बहुमत आहे. तसेच, सोलापूर महानगरपालिकेतही भाजपचे तब्बल ८७ नगरसेवक असून पंढरपूर, अक्कलकोट आणि बार्शी यांसारख्या मोठ्या आणि महत्त्वाच्या नगरपालिकांमध्ये पक्षाचे स्पष्ट बहुमत आहे.