Headlines

'लाडकी बहीण'मधील महिलांची संख्या कमी झाल्याने वाद:काँग्रेसने योजनेत 14 लाख पुरुषांची नावे घुसवली, भाजपचा आरोप




महाराष्ट्राच्या राजकारणात गेमचेंजर ठरलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’वरून सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडीत पुन्हा एकदा जोरदार कलगीतुरा रंगला आहे. विधानसभा निवडणुकीच्या काळात अत्यंत गाजलेल्या या योजनेतून तब्बल ९२ लाख लाडक्या बहिणींची नावे वगळण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यावरून विरोधकांनी सरकारवर ‘निवडणूक स्टंट’चा आरोप करत कोंडी करण्याचा प्रयत्न केला असता, भाजपनेही या टीकेला अत्यंत आक्रमकपणे प्रत्युत्तर दिले आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांच्यासह इतर विरोधी नेत्यांनी या मुद्द्यावरून सरकारवर तोफ डागली आहे. केवळ निवडणुकीच्या काळात महिलांना पैशांचे आमिष दाखवून मते पदरात पाडून घेण्याचा हा भाजपचा डाव होता, अशी टीका विरोधकांनी केली आहे. निवडणुकीच्या तोंडावर सरकारने कोणतीही योग्य पडताळणी न करता लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा केले. केवळ एक महिन्यांपूर्वी योजनेतून ८० लाख लाभार्थी कमी झाल्याचे सांगण्यात आले होते, मात्र आता हा आकडा थेट ९२ लाखांवर पोहोचला आहे. मूळ २.४ कोटी लाभार्थ्यांच्या तुलनेत ही घट तब्बल ३८ टक्के एवढी मोठी असून, महिलांची फसवणूक केल्याचा आरोप विरोधक करत आहेत. १४ लाख पुरुषांची नावे काँग्रेसनेच घुसविली, भाजपचा प्रतिआरोप विजय वडेट्टीवार यांच्या टीकेला भाजपचे प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. “लाडकी बहीण योजनेत जवळपास १४ लाखांच्या आसपास पुरुषांची नावे आढळून आली असून, काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनीच ही बोगस नावे योजनेत घुसविली,” असा खळबळजनक आरोप कुलकर्णी यांनी केला. “महायुती सरकारने ही योजना आणल्यापासून विरोधकांचे पोट दुखत आहे. या योजनेला खो घालण्यासाठी तुम्ही थेट न्यायालयाचे दरवाजे सुध्दा ठोठावले होते. वर्षानुवर्षे तुम्ही सत्तेत राहिलात, पण गरजू माता-भगिनींना कधी फुटकी कवडीही दिली नाही. आता आम्ही देतोय, तर तुमचे राजकारण सुरू झाले आहे,” अशा शब्दांत कुलकर्णी यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. योजना कधीच बंद होणार नाही, उलट निधी वाढवू भाजपने राज्यातील महिलांना आश्वस्त केले आहे की, ही योजना कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही. वेळप्रसंगी या योजनेच्या निधीत आणखी वाढ केली जाईल. मात्र, पडताळणीदरम्यान आढळलेली बोगस नावे, प्राप्तिकर भरणारे कुटुंब किंवा शासकीय सेवेत असणाऱ्या महिला कर्मचारी यांना नियमानुसार वगळावेच लागणार आहे. प्रशासकीय पारदर्शकतेसाठी बँक खात्याची ई-केवायसी (E-KYC) प्रक्रिया पूर्ण करणे अत्यंत आवश्यक असल्याचे राम कुलकर्णी यांनी स्पष्ट केले. तसेच, वडेट्टीवारांनी केवळ स्वतःच्या राजकारणासाठी जनतेत संभ्रम निर्माण करू नये, असा सल्लाही दिला. ९२ लाख नावे वगळण्याची प्रमुख कारणे कोणती? केवळ तांत्रिक अडचणींमुळे ही नावे कमी करण्यात आलेली नाहीत, तर छाननी दरम्यान खालील त्रुटी आढळल्या आहेत: हे ही वाचा… वहिनींचे सगळे हट्ट पुरवता, मग लाडक्या बहिणी जड झाल्यात का?:92 लाख महिला योजनेतून बाद, रोहिणी खडसेंची महायुती सरकारवर घणाघाती टीका राज्य सरकारच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी अशा ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतून तब्बल 92 लाख महिलांना अपात्र ठरवून वगळण्यात आले आहे. सुरुवातीच्या 2.4 कोटी लाभार्थींच्या तुलनेत ही घट तब्बल 38 टक्के इतकी मोठी आहे. एकाच महिन्यात अपात्र महिलांचा आकडा 80 लाखांवरून 92 लाखांवर पोहोचल्याने विरोधकांनी सरकारला धारेवर धरले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली आहे. सविस्तर वाचा…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *