![]()
महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा योजनेकरिता मुख्य जलस्रोत असलेल्या काटेपूर्णा (महान) प्रकल्पात बुधवारी केवळ १५.८६ दलघमी (१८.३७%) इतकाच उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सद्यःस्थितीत अत्यल्प पावसामुळे धरणातील पाण्याच्या पातळीत वाढ होत नसून पाण्याची मागणी मात्र सातत्याने वाढत आहे. दिवसेंदिवस धरणातील पाणीसाठ्यामध्ये लक्षणीय घट होत असल्यामुळे अकोला महानगरपालिका प्रशासनाने पाणीकपातीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शहरात सध्या चार दिवसाआड सुरू असलेला पाणीपुरवठा १६ जुलैपासून पाच दिवसांआड उर्वरित पान ४ सुमारे सात लाख लोकसंख्येच्या शहराला काटेपूर्णा धरणातून पाणीपुरवठा करण्यात येतो. परंतु यावर्षी पावसाळ्याची सुरुवात उशिरा झाली. मान्सून आल्यावरही जिल्ह्यात केवळ आठ दिवस मान्सूनचा पाऊस झाला. जिल्ह्यात आतापर्यंत केवळ १७८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी आतापर्यंत जिल्ह्यात २२९ मिलिमीटर पाऊस झाला आहे. अत्यल्प पावसाचा परिणाम जलसाठ्यांवर झाला असून काटेपूर्णा धरणातील साठ्यात यावर्षी काहीच वाढ झालेली नाही. उलट जलसाठा दिवसेंदिवस घटत आहे. कमी पावसाचा परिणाम
Source link
शहरात सहाव्या, सातव्या दिवशी पाणी:पाणीसाठ्यात मोठी घट झाल्याने मनपा प्रशासनाने घेतला निर्णय