![]()
खासदार संजय दिना पाटील यांच्यासोबत वावरणारी व्यक्ती नाशिकमधील 10 कोटींच्या केबल चोरी प्रकरणातील फरार आरोपी आहे का, असा खळबळजनक सवाल उपस्थित करत मनसेचे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे यांनी खासदारांना घेरले आहे. संविधानाला आणि लोकशाही व्यवस्थेला आव्हान देणाऱ्या अशा लोकप्रतिनिधीला सरकारने अद्याप ‘वाय प्लस’ सुरक्षा का बहाल केली आहे, अशी थेट विचारणा करत देशपांडे यांनी संजय पाटलांवर सध्या ‘वाईट संगतीचा परिणाम’ झाल्याचा टोला लगावला. खासदारांच्या या वादग्रस्त वर्तनावर आणि त्यांनी पत्रकारांशी केलेल्या वर्तणुकीवर मनसेने आता तीव्र आक्षेप घेतला आहे. संजय पाटलासोबतची व्यक्ती नाशिक 10 कोटी केबल चोरी प्रकरणातील फरार आरोपी आहे का? याचे उत्तर पोलिसांनी दिले पाहिजे. असे लोकं खरोखर असतील तर ते खासदारांसोबत काय करत आहेत? त्यांच्या मातोश्रीचा अपघात झाला ती गाडी या व्यक्तीच्या नावावर आहे का? असेल तर अशा लोकांना खासदार सोबत घेऊन फिरणार असतील तर खासदार संजय पाटील यांची भाषा तशीच होणार. त्यांच्यावर संगतीचा परिणाम झाला आहे, असे मनसे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे. पाटलांची भाषा पुरोगामी महाराष्ट्राला शोभणारी नाही संदीप देशपांडे म्हणाले की, खासदार संजय पाटील यांनी काल पत्रकारांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत होते. जी भाषा त्यांनी वापरली ती पुरोगामी महाराष्ट्राला शोभणारी नाही. ज्या पद्धतीने त्यांचे बोलणं होते ते लोकशाही व्यवस्थेला आव्हान देणारे होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाला आव्हान देण्याचे काम निवडून गेलेला लोकप्रतिनिधी करत असेल तर सामान्य माणसाने त्यातून काय धडा घ्यायचा? असा सवाल देशपांडे यांनी केला आहे. संजय पाटलांना ‘वाय प्लस’ का? संदीप देशपांडे म्हणाले की, संजय पाटील यांना वाय प्लस सुरक्षा सरकारने अजुनही का ठेवली आहे. शासनातर्फे त्यांना सुरक्षा दिली आहे त्यामधील कोणी त्यांच्याविरोधात गुन्हा का दाखल केला नाही? अजून त्या पोलिसांनी तसे काही केले नाही. माझी प्रशासनाला विनंती आहे की कायद्याने त्या व्यक्तीला सुरक्षा दिली जाऊ नये. परप्रांतीयाच्या विरोधात प्रक्षोभक भाषणं केले म्हणत त्यावेळच्या सरकारने राज ठाकरे यांची सुरक्षा काढून घेतल्याची आठवण त्यांनी करुण दिली. मग हाच न्याय संजय पाटील यांना लागू होतो का नाही गृहमंत्र्यांनी सांगितले पाहिजे. ती माजलेली दिलगिरी होती संदीप देशपांडे म्हणाले की, खासदार संजय दिना पाटील यांनी व्यक्त केलेली दिलगिरी हे माजलेली दिलगिरी होती. त्यांनी काय पत्रकारांवर दिलगिरी व्यक्त करत उपकार केले की काय? असा सवाल देशपांडे यांनी केला आहे. त्यांच्या बोलण्यातून त्यांना काही खंत किंवा वाईट वाटले असे वाटत नाही. कोणाचे तरी संरक्षण असल्याशिवाय ते असू वागू शकत नाही. जर सरकार त्यांच्यावर कारवाई झाली नाही तर उद्या कोणीही असे बोलेल. मुख्यमंत्र्यांनी हे सिद्ध केले पाहिजे, अगदी खासदार सुद्धा नाही हे फडणवीस यांनी सिद्ध करावे.
Source link
संजय पाटलांवर वाईट संगतीचा परिणाम:खासदारांसोबत फिरणारा व्यक्ती केबल चोरी प्रकरणातील फरार आरोपी?- संदीप देशपांडे