Headlines

संभाजीनगरात ‘एफएसएसएआय’चे नामांकित हॉटेल्स, मॉल्सवर छापे:पथक 2 दिवसांपासून मुक्कामी, अन्नपदार्थांचे नमुने जप्त




केंद्र सरकारच्या भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाच्या (एफएसएसएआय) विशेष पथकाने शहरात अचानक धडक मारली आहे. गेल्या दोन दिवसांपासून या पथकाने शहरातील नामांकित हॉटेल्स आणि प्रमुख मॉल्समध्ये छापे टाकून अन्नपदार्थांच्या गुणवत्तेची तपासणी सुरू केली आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी ही मोहीम राबवली जात आहे. कारवाईदरम्यान पथकाने थेट हॉटेल्सच्या स्वयंपाकघरात जाऊन अन्नपदार्थ, स्वच्छता आणि साठवणूक व्यवस्थेची सखोल पाहणी केली. यात काही संशयास्पद अन्नपदार्थ आणि कच्च्या मालाचे नमुने जप्त करण्यात आले असून ते पुढील तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले जाणार आहेत. मोहिमेबाबत गुप्तता एफएसएसएआयने या संपूर्ण मोहिमेबाबत प्रशासनाकडून गुप्तता पाळली. स्थानिक अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागालाही या बाबत कल्पना नव्हती. या अचानक झालेल्या कारवाईमुळे शहरातील हॉटेल व्यावसायिक आणि अन्न विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *