Headlines

सुप्रिया सुळेंच्या होणाऱ्या जावयाच्या कंपनीसोबत फडणवीसांचा मोठा करार:साडेपाच हजार कोटींची गुंतवणूक, रायगडमध्ये ऊर्जा प्रकल्प




राज्यातील ऊर्जा क्षेत्रात मोठी गुंतवणूक होणार असल्याची महत्त्वाची घोषणा समोर आली आहे. सुप्रिया सुळे यांची मुलगी रेवती सुळे आणि सारंग लखानी यांचे लवकरच लग्न होणार असताना, सारंग लखानी यांच्या कंपनीने राज्य सरकारसोबत मोठा सामंजस्य करार केला आहे. या कराराची एकूण किंमत सुमारे 5 हजार 760 कोटी रुपये असून, हा प्रकल्प राज्यातील वीज निर्मिती क्षमतेत मोठी भर घालणार असल्याचे सांगितले जात आहे. हा करार नोव्हँरियन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीसोबत करण्यात आला आहे. जलसंपदा विभागाच्या माध्यमातून हा प्रकल्प उभारण्यात येणार असून, रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील रानवाडी येथे त्याची अंमलबजावणी होणार आहे. या प्रकल्पाद्वारे 1200 मेगावॅट वीज निर्मिती करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या गुंतवणुकीमुळे राज्यातील ऊर्जा उत्पादनात मोठी वाढ होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाबाबत प्रतिक्रिया देताना सांगितले की, महाराष्ट्र उदंचन जलविद्युत प्रकल्पांच्या माध्यमातून देशात सर्वाधिक ऊर्जा निर्मिती क्षमता असलेले राज्य बनू शकते. या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर प्रकल्प सुरू असून, त्यातून सुमारे एक लाख मेगावॅट वीज निर्मितीची क्षमता उभारण्याचे उद्दिष्ट आहे. या नव्या करारामुळे त्या दिशेने आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला जाईल, असे त्यांनी नमूद केले. या प्रकल्पातून सुमारे 1,500 रोजगार निर्माण होणार असल्याची माहितीही देण्यात आली आहे. त्यामुळे स्थानिक स्तरावर रोजगाराच्या संधी वाढणार आहेत. करारावेळी सारंग लखानी यांचे वडील अरुण लखानी यांच्यासह जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि मंत्री गिरीश महाजन उपस्थित होते. लखानी कुटुंब हे उद्योग क्षेत्रात दीर्घकाळ कार्यरत असून, त्यांनी यापूर्वीही राज्य सरकारसोबत विविध प्रकल्पांमध्ये सहभाग घेतला आहे. ऊर्जा गरजा पूर्ण करण्यासाठी महत्त्वाचा करार विशेष म्हणजे, हा उदंचन जलविद्युत क्षेत्रातील 56 वा सामंजस्य करार असल्याचे सांगितले जात आहे. राज्यात ऊर्जा क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी सरकार प्रयत्न करत असून, अशा करारांमुळे पायाभूत सुविधांचा विकास वेगाने होणार आहे. दरम्यान, या करारामुळे राजकीय आणि औद्योगिक वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. सुप्रिया सुळे यांच्या कुटुंबाशी संबंधित व्यक्तीच्या कंपनीसोबत झालेला हा करार असल्याने काही स्तरांवर चर्चा सुरू झाली आहे. मात्र, सरकारच्या मते हा करार पूर्णपणे विकासाभिमुख असून, राज्याच्या ऊर्जा गरजा पूर्ण करण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *