![]()
मराठवाड्याची जीवनवाहिनी असलेल्या जायकवाडी नाथसागर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस सुरू असून, नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून गोदावरी नदीपात्रात होणाऱ्या पाण्याच्या विसर्गात टप्प्याटप्प्याने वाढ करण्यात आली. त्यामध्ये सकाळी ६ वाजता ३,२२८ क्युसेक, दुपारी ३ वाजता ७,९२४ क्युसेक, तर दुपारी ४ वाजता त्यामध्ये वाढ होत ११,०७९ क्युसेक विसर्ग करण्यात आला. त्यानंतर हा विसर्ग २१९६५ केला. संध्याकाळी यामध्ये पुन्हा घट होत संध्याकाळी १०,५१५ क्युसेक विसर्ग करण्यात आला. त्यामुळे जायकवाडीच्या पाणीसाठ्यात साधारण एक टीएमसी पाण्याची वाढ होऊ शकते. बुधवारी हे पाणी जायकवाडीत दाखल होण्याचा अंदाज आहे. चालू पावसाळी हंगामात म्हणजेच १ जूनपासून आजतागायत धरणात केवळ २१.३०९० दलघमी (०.७५ टीएमसी) पाण्याची आवक झाली आहे.मंगळवारी सकाळी ६ वाजेपर्यंतच्या नोंदीनुसार, नाथसागर धरणात ६१६.१०५ दलघमी म्हणजेच केवळ २८.३८ टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. गेल्या वर्षी याच दिवशी धरणात ११३६.७४९ दलघमी (५२.३६ टक्के) उपयुक्त साठा होता. म्हणजेच यंदा धरणातील साठा मागील वर्षाच्या तुलनेतही खालावला आहे. सध्या धरणातून उजवा-डावा कालवा, जलविद्युत केंद्र किंवा सांडव्याद्वारे कोणताही विसर्ग केला जात नसला, तरी आगामी काही दिवसांत नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यांत पाऊस झाल्यास पाण्याची आवक वाढणार आहे. नाथसागर धरणात ६१६.१००५ दलघमी म्हणजेच केवळ २८.३८ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी याच दिवशी धरणात ११३६.७४९ दलघमी ५२.३६ टक्के उपयुक्त साठा होता. जायकवाडी धरण क्षेत्रात आणि वरच्या भागात पाऊस सुरू असून, पाण्याची आवक वाढण्याची शक्यता आहे. वरील धरणातून टप्प्याटप्प्याने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. – मंगेश शेलार, शाखा अभियंता, जायकवाडी धरण
Source link
1 टीएमसीची वाढ होणार:जायकवाडी धरणामध्ये आज पाणी पोहोचणार, नांदूर-मधमेश्वर बंधाऱ्यातून 10,515 क्युसेकने विसर्ग सुरू