Headlines

ओव्हरटेक करताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने अजिंठा घाटामध्ये ट्रक उलटला:लसणाने भरलेला ट्रक जात होता केरळला‎




अजिंठा घाटातील वळणावर वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात लसणाने भरलेला एक ट्रक उलटल्याची घटना मंगळवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास घडली. चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा ट्रक रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाला. या अपघातात चालक आणि क्लीनर दोघेही बचावले असून, ट्रकचे नुकसान झाले आहे. राजस्थानहून केरळच्या दिशेने लसूण घेऊन जाणारा ट्रक (आरजे २० जीसी ४३८१) मंगळवारी सकाळी अजिंठाघाटात आला होता. घाटातील घोडी पटांगण जवळील वळणावर चालकाने वाहनाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. मात्र, वळणाचा अंदाज न आल्याने चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले आणि भरधाव ट्रक थेट रस्त्याखाली उतरून पलटी झाला. नागरिकांच्या मदतीने केबिनमध्ये अडकलेले चालक राजेश कुमार आणि क्लीनर यशवंत सिंग (दोघे रा. जलवा, राजस्थान) यांना सुखरूप बाहेर काढले. पलटी झालेला ट्रक पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *