Headlines

अपघात:अरणजवळ भरधाव कार चारीत उलटून मोडनिंबचे तिघे जखमी




भरधाव स्विफ्ट कार रस्त्याच्या कडेला असलेल्या चारीत कोसळून झालेल्या अपघातात कार चालकासह तिघे जण जखमी झाले. हा अपघात पुणे महामार्गावर अरण (ता.माढा) नजीक शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारास घडला. गंभीर जखमीस पंढरपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोडनिंब येथून टेंभुर्णीकडे जाणारी कार (एमएच १२ आरएफ ३५१६) भरधाव वेगाने जात असताना कार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने रस्त्याकडेला असलेल्या चारीत कोसळून दोनदा पलटी झाली. या अपघातामध्ये सुमित सुनील बिनगे (वय १९), प्रथमेश दत्तात्रेय बिनगे (वय २०), चालक समर्थ सतीश साळुंके (वय २२,रा. मोडनिंब, ता. माढा) जखमी झाले. वरवडे टोल नाका येथील रुग्णवाहिकेमधून डॉ. प्रशांत कारंजकर आणि रुग्णवाहिका चालक बंडू गायकवाड यांनी पंढरपूर येथील खासगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी जखमींना दाखल केले. अपघाताची माहिती मिळताच वरवडे टोल नाका येथील ग्रस्तीपथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. दोन वेळा कार पलटी झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *