Headlines

पंढरीत डाळिंबाची आवक वाढल्याने दरात निम्म्याने घट:नाईलाजाने मिळेल त्या‎दराने डाळिंबाची विक्री‎




दिल्ली परिसरात पाऊस झाल्याने पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत १५ दिवसांत डाळिंबाची आवक वाढली आहे. त्यामुळे डाळिंबाचे दर सरासरी १०० रुपये प्रतिकिलो घसरले आहेत. सध्या डाळिंबाचा दर किमान ४० ते कमाल १२० रुपयांपर्यंत घसरले आहेत. त्यामुळे डाळिंब उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. डाळिंबाचे घटलेले क्षेत्र वाढत आहे. शिवाय दिल्ली परिसरात झालेल्या पावसाचा परिणामही दरावर झाला. एक महिन्यापूर्वी डाळिंबाला तब्बल १५० ते २०० रुपयांपर्यंतचा दर मिळत होता. त्यानंतर तो दर ४० रुपये ते १०० पर्यंत खाली आला. मागील काही दिवसांपासून चांगल्या प्रतिच्या डाळिंबाला ६०, ८०, १०० रुपयांपर्यंतचा भाव मिळत होता. तर कमी दर्जा असलेल्या मालाला अवघा ३० ते ४० रूपये भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडल्याचे चित्र आहे. ^शेतात थेट शेतकऱ्यांकडून खरेदीसाठी येणाऱ्या व्यापाऱ्यांकडून मागील महिन्यात १६० रुपयांपेक्षा जास्त दर मिळत होता. परंतु गेल्या काही दिवसात दररोज दर खाली येत आहे. सध्या अवघा ५० ते ६० रुपयांपर्यंत दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. नाईलाजाने मिळेल त्या दराने डाळिंब काढून द्यायची वेळ आली आहे. तुकाराम विभूते, शेतकरी, वाखरी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *