Headlines

मंगळवेढा:शिवसेनेबाबत सुप्रिम कोर्ट योग्य निर्णय घेईल




शिवसेना पक्ष कोणाचा, याबाबत अजून सुनावणी पूर्ण झाली नाही, कुणाच्या बाजूने निकाल लागेल ते आपण कसे सांगू शकतो. एका बाजूने युक्तिवाद केला आहे, दुसरी बाजूने युक्तिवाद सुरू आहे, त्यानंतर त्यानंतर सर्वोच्च न्यायालय योग्य निर्णय देईल, असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले. नंदूर (ता. मंगळवेढा) येथील आवताडे शुगर येथे उभारण्यात येणाऱ्या १२ टीपीडी क्षमतेच्या सीबीजी (कॉम्प्रेस्ड बायोगॅस) प्रकल्पाचा भूमिपूजन समारंभ तसेच सहजीवन निर्मिती प्रकल्पातून वीज वितरणाचा शुभारंभ शुक्रवारी विधानसभा अध्यक्ष ॲड. नार्वेकर यांच्या हस्ते करण्यात आला, त्याप्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी मंगळवेढा-पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे होते. देशात व महाराष्ट्रात लोकप्रतिनिधींचे अनेक साखर कारखाने आहेत, परंतु एखादा लोकप्रतिनिधी साखर कारखाना केवळ आपल्या मतदारसंघातील आपल्या विभागातील लोकांच्या कल्याणासाठी चालवणारा हा पहिला लोकप्रतिनिधी मी बघितला असे गौरवोद्गार विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर यांनी काढले. या वेळी व्यासपीठावर आवताडे शुगर चे चेअरमन संजय आवताडे, पंचायत समितीच्या सभापती दिपाली ताड , जिल्हा परिषद सदस्य प्रदीप खांडेकर,करुणा शिवशरण, माजी सभापती विष्णुपंत आवताडे ,माजी नगराध्यक्ष प्रकाश गायकवाड उपस्थित होते. कार्यक्रमास कारखान्याचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, सभासद, शेतकरी, ऊस उत्पादक तसेच परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जबाबदारी दिली तर आवताडे सोनेच करतील मंत्रिपद विस्तारामध्ये जिल्ह्याला न्याय मिळणार आहे का? याबाबत विचारले असता, काही काळजी करू नका ,ही पांडुरंगाची भूमी आहे, या भूमीला कोणीही वंचित येऊ शकत नाही. आमदार समाधान आवताडे प्रभावशाली आमदार आहेत. त्यामुळे आमदार म्हणून चांगले काम केले आहे, यापुढे जी जबाबदारी येईल त्याचे ते सोनेच करतील एवढी खात्री देतो. त्यांना येत्या काळात संधी मिळणार हे निश्चित आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *