Headlines

इसापूरमधून 4, तर सिद्धेश्वरमधून 3 पाणीपाळ्या सोडणार:दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणी पाळ्यांमध्ये कपात, 1.70 लाख हेक्टरला होणार फायदा




इसापूर धरणातून चार तर सिद्धेश्वर धरणातून तीन पाणीपाळ्या सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे पाणी पाळ्यामध्ये कपात करण्यात आली आहे. मागील वर्षी इसापूरंमधून सात तर सिद्धेश्वरमधून सहा पाळीपाळ्या सोडण्यात आल्या होत्या. या पाणी पाळ्यांच्या नियोजनामुळे 1.70 लाख हेक्टर क्षेत्राला फायदा होणार आहे. यावर्षी दुष्काळी परिस्थतीमुळे धरणातील पाणीसाठा वाढलाच नाही. मागील वर्षी धरणे 100 टक्के भरलेले असतांना यावर्षी मात्र धरणात 30 ते 50 टक्केच पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे धरणातून रब्बी व उन्हाळी हंगामासाठी पाणी पाळ्या मिळणार की नाही असा प्रश्‍न निर्माण झाला होता. त्यातच शासनाने धरणातील पाणी राखून ठेवण्याच्या सूचना दिल्याने आणखीन संभ्रमाचे वातावरण होते. त्यातही कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत पाणी पाळ्यांबाबत नियोजन करण्याचे निश्‍चित झाले होतेे. दरम्यान, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये हिंगोली, नांदेड व यवतमाळ जिल्हयासाठी महत्वपूर्ण असलेल्या इसापूर धरणातून रब्बीसाठी दोन व उन्हाळीसाठी दोन अशा एकूण चार पाणी पाळ्या सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मागील वर्षी धरणातून रब्बीसाठी चार व उन्हाळीसाठी तीन पाणी पाळ्याचे नियोजन झाले होते.यावर्षी मात्र यात कपात झाली आहे. दरम्यान, इसापूर धरणातून 1 नोव्हेंबर रोजी पहिली पाणीपाळी सोडली जाणार असल्याचे उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाच्या सुत्रांनी सांगितले. या धरणातील पाणी पाळ्यामुळे 1.10 लाख हेक्टर क्षेत्राला सिंचनासाठी फायदा होणार आहे. या शिवाय सिध्देश्‍वर धरणातून रब्बीसाठी दोन तर उन्हाळीसाठी एक पाणी पाळी सोडण्याचे नियोजन झाले आहे. मागील वर्षी रब्बीसाठी तीन तर उन्हाळीसाठी तीन अशा सहा पाणी पाळ्याचे नियोजन झाले होते. यावर्षी यामध्ये कपात झाली आहे. 1 नोव्हेंबर रोजी पहिली पाळी सोडली जाणार आहे. यामुळे 60 हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. या पाणी पाळ्यामुळे हरभरा पिकांना फायदा होणार असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. असे असेल सिद्धेश्वरचे पाणी नियोजन सिद्धेश्वर धरणातून 1 नोव्हेंबर रोजी पहिली पाळी, 1 जानेवारी रोजी दुसरी उन्हाळीसाठी, 1 मार्च रोजी तिसरी पाणीपाळी सोडली जाणार आहे. पहिली पाणीपाळी 24 दिवसांची तर इतर दोन्ही पाणीपाळ्या 20 दिवसांच्या असणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *