Headlines

Sharad Ponkshe Controversial Statement on Manusmriti in Nagpur


“ज्या काळात युरोपातील प्रगत म्हणवल्या जाणाऱ्या देशांमधील जनता अंगावर कपडे कसे घालायचे याचेही भान नसलेल्या रानटी अवस्थेत जंगलात वावरत होती, त्या अत्यंत प्राचीन काळात माझ्या ऋषितुल्य पूर्वजांनी जगातील पहिला संविधान ग्रंथ लिहिला; आणि तो ग्रंथ म्हणजेच ‘म

.

नागपूर येथील राणी लक्ष्मी दुर्गोत्सव मंडळाच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारधारेवर आयोजित व्याख्यानमालेत शरद पोंक्षे प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. या वेळी त्यांनी प्राचीन भारतीय ग्रंथसंपदा, मातृभाषेचे महत्त्व, शिक्षण व्यवस्थेचा इतिहास, डाव्या विचारसरणीची आंदोलने आणि स्वातंत्र्यलढ्यातील विविध प्रवाहांवर मते व्यक्त केली.

मनुस्मृती हा जगातील पहिला संविधान ग्रंथ -शरद पोंक्षे

भारतीय ज्ञानपरंपरेचे महत्त्व विशद करताना शरद पोंक्षे यांनी पाश्चात्त्य आणि भारतीय संस्कृतीची तुलना केली. “आपल्या देशातील नवी पिढी आपल्याच समृद्ध ज्ञानपरंपरेपासून दुरावत चालली आहे. वेद, उपनिषदे, पुराणे, महाभारत आणि संस्कृत साहित्यामध्ये विज्ञानाचा मोठा ठेवा दडलेला आहे. पृथ्वीचा गोलाकार आकार आणि खगोलशास्त्रातील अनेक गुंतागुंतीच्या संकल्पना आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये हजारो वर्षांपूर्वीच मांडून ठेवल्या आहेत. ऋग्वेद हा जगातील पहिला ग्रंथ मानला जातो.”

इंग्रजीच्या प्रभावामुळे संस्कृतची उपेक्षा

“गेल्या अडीचशे वर्षांच्या इंग्रजी प्रभावामुळे आणि मेकॉलेप्रणीत शिक्षणामुळे आपण स्वतःच्या भाषांकडे दुर्लक्ष केले. देवनागरी ही जगातील एकमेव परिपूर्ण वैज्ञानिक लिपी आहे; जिथे जसे बोलले जाते, तसेच तंतोतंत लिहिले जाते. संस्कृत भाषेचे ज्ञान नसल्यामुळे नव्या पिढीला प्राचीन ग्रंथांमधील ज्ञानाची खोली समजू शकलेली नाही.”

मुलींना बुरख्यात बघायचे नसेल तर भाजपच सत्तेत हवी!

सध्याच्या देशातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना त्यांनी स्पष्ट शब्दांत आपली भूमिका मांडली. “भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या अनेक गोष्टी, धोरणे मला स्वतःला पटत नाहीत. त्यावर माझी असहमती असू शकते. मात्र, जर या देशातील सनातन हिंदू संस्कृतीचे अस्तित्व टिकवायचे असेल आणि भविष्यात आपल्या घरादारांतील लेकी-सुनांना बुरख्यात वावरताना पाहायचे नसेल, तर आपल्याला केंद्रात भाजपचेच सरकार असणे अनिवार्य आहे.”

भाषा शुद्धी आणि सांस्कृतिक अस्मिता

“भाषा आणि संस्कृती हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. भाषा संपली की संस्कृतीचा विनाश अटळ असतो. सावरकरांनी म्हणूनच ‘भाषाशुद्धी’चा आग्रही पुरस्कार केला होता. परकीय शब्दांचे आक्रमण रोखून मातृभाषेतून संवाद साधणे हीच खरी सांस्कृतिक अस्मिता आहे.”

सावरकरांच्या साहित्याची जाणीवपूर्वक उपेक्षा

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या साहित्यिक योगदानावर प्रकाश टाकताना त्यांनी साहित्यातील पक्षपातावर बोट ठेवले. “स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सुमारे 20 हजार पानांचे अजरामर, उत्तुंग आणि विचारप्रवर्तक साहित्य निर्माण केले. रवींद्रनाथ टागोरांना जेव्हा साहित्याचे नोबेल पारितोषिक मिळाले, तेव्हा सावरकरांनी अतिशय मोठ्या आणि खुल्या मनाने त्यांचे अभिनंदन केले होते. टागोरांच्याच तोडीचे आणि ताकदीचे साहित्य स्वतः निर्माण केलेले असूनही, केवळ आपण सशस्त्र क्रांतिकार्यात सक्रिय होतो म्हणून व्यवस्थेने आपल्या साहित्याला पुरस्कारांपासून आणि सन्मानापासून वंचित ठेवले, अशी खंत सावरकरांच्या मनात आयुष्यभर राहिली असावी.”

स्वातंत्र्यानंतर पहिले पाच शिक्षणमंत्री मुस्लिम का?

स्वातंत्र्योत्तर काळातील काँग्रेसच्या धोरणांवर आणि शिक्षण पद्धतीवर पोंक्षे यांनी अत्यंत आक्रमक भाष्य केले. “स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या देशातील नव्या पिढीच्या घडणीची आणि शिक्षण व्यवस्थेची दिशा ठरवण्याची जबाबदारी कोणाकडे दिली गेली? स्वातंत्र्यानंतर सलग पहिले पाच केंद्रीय शिक्षणमंत्री हे एका विशिष्ट मुस्लिम समाजाचे होते. शिक्षण व्यवस्थेच्या या रचनेमुळे भारतीय इतिहासाचे आणि संस्कृतीचे खरे रूप दडपले गेले.”

देशात 8 टक्के मुस्लिम राहण्यास गांधीजीच जबाबदार

“धर्माच्या नावावर देशाची फाळणी झाली आणि मुस्लिमांसाठी पाकिस्तान हा स्वतंत्र देश निर्माण करण्यात आला. असे असतानाही महात्मा गांधी यांच्या अवाजवी हट्टामुळे भारतात आठ टक्के मुस्लिम समाज राहिला.”

अनोखा विरोधाभास

“आयुष्यभर अहिंसा आणि उपोषणाचा पुरस्कार करणाऱ्या महात्मा गांधींचा मृत्यू अखेर गोळी लागून झाला; तर दुसरीकडे आयुष्यभर सशस्त्र क्रांतीचा धगधगता पुरस्कार करणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आपल्या आयुष्याचा शेवट प्रायोपवेशनाने (अन्नत्याग करून उपोषणाने) केला, हा इतिहासाचा एक मोठा विरोधाभास आहे.”

इतिहास न वाचलेली भरकटलेली तरुणाई रस्त्यावर

देशभरात सध्या विविध मुद्द्यांवरून डाव्या विचारसरणीच्या संघटनांकडून सुरू असलेल्या आंदोलनांचा समाचार घेताना ते म्हणाले. “सध्याच्या घडीला रस्त्यावर उतरून घोषणाबाजी करणाऱ्या तरुणाईला ना देशाचा इतिहास ठाऊक आहे, ना आंदोलनामागील पडद्यामागची कारणे समजतात. या पिढीने सावरकरांचे किंवा इतर राष्ट्रपुरुषांचे विचार कधी वाचलेलेच नाहीत.”

बिनबुडाचे आरोप आणि गोंधळ

“केवळ ‘आम्ही म्हणतो म्हणून राजीनामा द्या’ अशा मागण्या लावून धरणे ही एक फॅशन झाली आहे. संबंधित संविधानिक पदावरील व्यक्तीने नेमका कोणता गुन्हा केला, याचे कोणतेही पुरावे दिले जात नाहीत किंवा ते सिद्धही केले जात नाहीत. केवळ सनसनाटी निर्माण करण्यासाठी आरोप करणे आणि व्यवस्था वेठीस धरणे हाच या आंदोलनांचा छुपा हेतू आहे,” असा घणाघाती आरोप शरद पोंक्षे यांनी शेवटी केला.

————————————————————-

हेही वाचा…

दुष्काळात बीडमध्ये 80 कोटींचा बोगस पशुधन घोटाळा: दिवाळीआधी हेक्टरी 1 लाख न दिल्यास मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर इशारा

“महाराष्ट्रातील 18 जिल्ह्यांमध्ये यंदा सरासरी 37 टक्क्यांपर्यंत पाऊस कमी झाला असून दुष्काळाने शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. मात्र, या भीषण संकटातही शेतकऱ्यांच्या तोंडचा घास पळवणारे भ्रष्ट लांडगे सत्तेच्या वळचणीला बसून तिजोरी लुटायला टपले आहेत. बीड जिल्ह्यात पशुधन योजना प्रत्यक्षात येण्यापूर्वीच ‘वैदेही ॲग्रो’ कंपनीच्या संचालकांनी शासनातील लोकांच्या संगनमताने तब्बल 80 कोटी रुपयांचे बोगस प्रस्ताव तयार केले होते. वेळीच तक्रारी झाल्याने हे प्रस्ताव रद्द करावे लागले, हा दुष्काळातील लांडगेगिरीचा जिवंत नमुना आहे. गुजरातला न मागता हजारो कोटींची मदत देणारे मोदी सरकार महाराष्ट्राला मात्र भीक मागायला लावत आहे. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी 1 लाख रुपयांची थेट मदत जाहीर केली नाही, तर राज्यात शेतकऱ्यांचा प्रचंड उद्रेक होईल आणि सत्ताधारी मंत्र्यांना रस्त्यावर फिरणे मुश्किल केले जाईल,” असा संतप्त व इशारा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.