“शासकीय मान्यता नसतानाही उघडपणे 70 ते 80 हजार रुपयांमध्ये हलाल प्रमाणपत्रे विकली जात आहेत. केवळ खाण्यापिण्याच्या वस्तूच नव्हे, तर आता कपडे आणि औषधांवरही हलालचे शिक्के मारून समांतर अर्थव्यवस्था उभी केली जात आहे. या हलाल जिहादच्या माध्यमातून गोळा होणार
.
सिंधुदुर्ग येथून हलाल प्रमाणपत्राविरोधात ‘चांदा ते बांदा’ या राज्यव्यापी हिंदू जनजागृती अभियानाची अधिकृत घोषणा करताना ते माध्यमांशी बोलत होते. नितेश राणे यांच्या या वक्तव्यामुळे आणि मोहिमेमुळे राज्यातील सामाजिक व राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा नवा वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
औषधांपासून कपड्यांपर्यंत हलालचा विळखा; 70-80 हजारात प्रमाणपत्रांची विक्री
हलाल प्रमाणपत्राच्या नावाखाली सुरू असलेल्या गैरप्रकारांवर बोट ठेवताना नितेश राणे म्हणाले, कोणत्याही सरकारी किंवा कायदेशीर अधिकारांशिवाय खाजगी संस्थांकडून 70 ते 80 हजार रुपयांना हलाल प्रमाणपत्रे सर्रास विकली जात आहेत. सुरुवातीला केवळ मांसाहारापुरती मर्यादित असलेली ही संकल्पना आता शाकाहारी अन्नपदार्थ, दैनंदिन उपयोगाच्या वस्तू, कपडे आणि जीवनरक्षक औषधांपर्यंत लादली जात आहे. कोणत्याही वस्तूवर हलालचा शिक्का मारून ग्राहकांना ती खरेदी करण्यास भाग पाडले जात आहे.
हलाल जिहादचा निधी हिंदू समाज आणि देशाच्या विरोधात!
या प्रमाणपत्रांच्या माध्यमातून गोळा होणाऱ्या पैशांवर गंभीर आरोप करताना ते म्हणाले, हलाल प्रमाणपत्रांच्या विक्रीतून आणि व्यापारातून जमा होणारा अवाढव्य निधी हा ‘हलाल जिहाद’चा भाग आहे. हा पैसा राष्ट्रविरोधी कारवायांना आणि हिंदू समाजाला दुर्बल करण्यासाठी वापरला जात असल्याचा गंभीर दावा त्यांनी केला. सनातन हिंदू धर्मपरंपरेमध्ये हलाल संकल्पनेला अजिबात स्थान नाही. असे असताना बहुसंख्य हिंदू समाजावर अशा उत्पादनांची खरेदी अप्रत्यक्षपणे लादणे चुकीचे आहे.
‘चांदा ते बांदा’ जनजागृती अभियान सुरू
हिंदू समाजात जनजागृती निर्माण करण्यासाठी राज्यव्यापी लढा उभारणार असल्याचे स्पष्ट करत राणे म्हणाले, हिंदू बांधवांनी बाजारात खरेदी करताना वस्तू हलाल प्रमाणित आहे का ते तपासावे आणि अशा कोणत्याही वस्तूंवर किंवा हलाल प्रमाणित आस्थापनांवर बहिष्कार टाकावा. महाराष्ट्राच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत म्हणजे ‘चांदा ते बांदा’ संपूर्ण राज्यभरात हे अभियान नेले जाईल. घराघरांपर्यंत पोहोचून हलाल अर्थव्यवस्थेच्या धोक्यांविषयी हिंदूंना जागरूक केले जाईल. नितेश राणे यांच्या या आक्रमक भूमिकेनंतर व्यापारी वर्ग आणि विविध सामाजिक संघटनांमधून काय प्रतिक्रिया उमटतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
—————————————-
हेही वाचा…
दुष्काळात बीडमध्ये 80 कोटींचा बोगस पशुधन घोटाळा: दिवाळीआधी हेक्टरी 1 लाख न दिल्यास मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर इशारा

“महाराष्ट्रातील 18 जिल्ह्यांमध्ये यंदा सरासरी 37 टक्क्यांपर्यंत पाऊस कमी झाला असून दुष्काळाने शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. मात्र, या भीषण संकटातही शेतकऱ्यांच्या तोंडचा घास पळवणारे भ्रष्ट लांडगे सत्तेच्या वळचणीला बसून तिजोरी लुटायला टपले आहेत. बीड जिल्ह्यात पशुधन योजना प्रत्यक्षात येण्यापूर्वीच ‘वैदेही ॲग्रो’ कंपनीच्या संचालकांनी शासनातील लोकांच्या संगनमताने तब्बल 80 कोटी रुपयांचे बोगस प्रस्ताव तयार केले होते. वेळीच तक्रारी झाल्याने हे प्रस्ताव रद्द करावे लागले, हा दुष्काळातील लांडगेगिरीचा जिवंत नमुना आहे. गुजरातला न मागता हजारो कोटींची मदत देणारे मोदी सरकार महाराष्ट्राला मात्र भीक मागायला लावत आहे. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी 1 लाख रुपयांची थेट मदत जाहीर केली नाही, तर राज्यात शेतकऱ्यांचा प्रचंड उद्रेक होईल आणि सत्ताधारी मंत्र्यांना रस्त्यावर फिरणे मुश्किल केले जाईल,” असा संतप्त व इशारा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी