Headlines

विकासाला गती:लासलगावसह 5 गावांना एकत्र करत नगरपरिषद निर्मितीचा प्रयत्न




लासलगाव, टाकळी विंचूर, पिंपळगाव नजीक, ब्राह्मणगाव व निमगाव वाकडा ही गावे एकत्र करून लासलगाव नगरपरिषद निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नगरपरिषद झाल्यास मोठी शासकीय यंत्रणा उपलब्ध होण्याबरोबरच विविध योजनांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी मिळून लासलगाव व परिसराच्या विकासाला अधिक गती मिळेल, असे प्रतिपादन मंत्री छगन भुजबळ यांनी केले. लासलगाव येथे विविध विकासकामांच्या लोकार्पण व भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ उपस्थित होते. मुंबई बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर, लासलगाव बाजार समितीचे सभापती डी. के. जगताप, जिल्हाध्यक्ष दिलीप खैरे, वसंत पवार, तालुकाध्यक्ष भाऊसाहेब भवर, उपसभापती ललित दरेकर, पंढरीनाथ थोरे, बाळासाहेब क्षीरसागर, सुवर्णा जगताप, सोनिया होळकर यांच्यासह तहसीलदार विशाल नाईकवाडी, सहाय्यक गटविकास अधिकारी पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता प्रकाश घोडे, शाखा अभियंता गणेश चौधरी, संकेत चौधरी आदी उपस्थित होते. भुजबळ म्हणाले की, लासलगाव हे राज्यातील महत्त्वाचे कृषी व व्यापारी केंद्र आहे. { उर्वरित पान. ३ २०११ च्या जनगणनेनुसार लासलगाव शहराची लोकसंख्या १७ हजार ३६० नोंदविण्यात आली आहे. तर येथील ५० टक्के रोजगार हा बिगरशेती क्षेत्रातून येतो. ग्रामपंचायतीला पाणीपट्टी व घरपट्टी व्यक्तिरीक्त कर स्वरुपात सुमारे दीड कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते. {मंत्री भुजबळ यांच्या हस्ते लासलगाव रेल्वे उड्डाणपूल, पोहोच मार्ग व बाह्यवळण रस्ता यांचे लोकार्पण करण्यात आले. या कामासाठी १०९ कोटी ६८ लाख रुपये खर्च झाला आहे. {लासलगाव-पाटोदा रस्त्यावरील पुलाचे ४ कोटी ५० लाख रुपयांचे काम लोकार्पित झाले. {पिंपळगाव-पालखेड-लासल गाव रस्ता सुधारणेच्या ४५ कोटींच्या कामाचे भूमिपूजन झाले. २५ हजार लोकसंख्या आवश्यक : लहान नागरी क्षेत्रासाठी किमान २५ हजार लोकसंख्या आणि ३५% बिगरशेती रोजगार आवश्यक आहे. फक्त लोकसंख्या पुरेशी नाही : नगरपरिषद स्थापनेवेळी शासन लोकसंख्या, लोकसंख्या घनता, स्थानिक महसूल, बिगरशेती रोजगाराचे प्रमाण आणि आर्थिक महत्त्व या बाबींचा विचार करते. घनता-उत्पन्नाची स्वतंत्र मर्यादा : कायद्यात लोकसंख्या घनता किंवा महसुलासाठी स्वतंत्र किमान आकडा निश्चित केलेला नाही. लोकसंख्येनुसार वर्गवारी : ‘क’ वर्ग – २५ ते ४० हजार, ‘ब’ वर्ग – ४० हजारांपेक्षा अधिक ते १ लाख, ‘अ’ वर्ग – १ लाखांपेक्षा अधिक.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *