![]()
नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याला येणारे भाविक पैठण येथेही संत एकनाथ महाराजांच्या दर्शनासाठी येणे अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य सुविधा बळकट करण्यासाठी पैठण येथे १०० खाटांचे नवीन उपजिल्हा रुग्णालय स्थापन करण्यात येणार आहे. हे उपजिल्हा रुग्णालय सुरू करण्याचा प्रस्ताव मे २०२५ मध्ये देण्यात आला होता. विशेष म्हणजे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे पैठण येथील ३० खाटांच्या हॉस्पिटलमधील खाटांची संख्या १०० करण्यात येणार आहे. उपजिल्हा रुग्णालयासाठी यापूर्वी पाठवण्यात आलेल्या प्रस्तावामध्ये त्रुटी होत्या. आरोग्य सेवा उपसंचालक कार्यालयाकडून त्रुटींची पूर्तता करून सुधारित प्रस्ताव आणि २२ जून रोजी आरोग्य सेवा आयुक्तालयाकडे सर्वसमावेशक आराखडा सादर करण्यात आला आहे. कुंभमेळ्यामुळे गतीने मान्यता मिळणार कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा आणखी सक्षम करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिकमध्ये आलेले भाविक छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेरूळ आणि पैठण येथे दर्शनासाठी येणार आहेत. त्यामुळे दोन्ही तीर्थक्षेत्रांवरील पायाभूत सुविधा मजबूत करण्यात येत आहेत. वेरूळ येथेही रुग्णालय प्रस्तावित आहे. त्यावर लवकरच निर्णय अपेक्षित आहे. पैठण येथील या उपजिल्हा रुग्णालयाला तातडीने मान्यता मिळण्याची शक्यता आहे. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार विलास भुमरे यांच्या बैठकीत यामध्ये १०० खाटांच्या रुग्णालयाबाबत चर्चा करण्यात आली.
Source link
पैठणला आरोग्य विभाग:100 खाटांचे नवीन उपजिल्हा रुग्णालय उभारणार; नाशिक कुंभमेळा: आरोग्य सेवा आयुक्तालयाकडे सर्वसमावेशक आराखडा सादर