![]()
सटाणा साक्री-शिर्डी राष्ट्रीय महामार्गावर ढोलबारे शिवारातील गंगाई पेट्रोल पंपाजवळ कांदा चाळीसमोर कार आणि दुचाकीच्या अपघातात दुचाकीस्वार संजय छगन चौधरी (३६, रा. कुडाशी) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. गुरुवारी (दि. २०) मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात झाला. प्राथमिक माहितीनुसार, कार सटाण्याकडून ताहाराबादकडे जात असताना समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक झाली. अपघाताची तीव्रता इतकी होती की, दुचाकीस्वार काही अंतरापर्यंत फरपटत गेल्याचे स्थानिकांनी सांगितले. गंभीर जखमी संजय चौधरी यांना तातडीने सटाणा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या अपघातामुळे साक्री-शिर्डी महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या मार्गावरील वळणे व धोकादायक ठिकाणी गतिरोधक किंवा सूचनाफलक नसल्याने वाहनांचा वेग मोठा असतो. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत आहे. काही दिवसांपूर्वी पिंगळवाडे येथील एका शेतकऱ्याचा याच परिसरात अपघात होऊन मृत्यू झाला. अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
Source link
साक्री-शिर्डी महामार्गावर ढोलबारे शिवारातील अपघातात एक ठार:सूचना फलकांचा अभाव