Headlines

नगरपालिकेत चकरा:कन्नड पालिकेतील सफाई कर्मचारी ग्रॅच्युइटी, जीपीएफ लाभापासून वंचित, पालिकेतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे मुख्याधिकाऱ्यांना साकडे




कन्नड नगर परिषदेतील सफाई कर्मचारी पंचवीस ते तीस वर्षे काम करून सेवानिवृत्त झाले. त्यातल्या काही जणांचा मृत्यू झाला. काही जण जिवंत आहेत. मागील दहा वर्षांपासून कर्मचारी व त्यांचे वारसदार जीपीएफ, ग्रॅच्युइटी, रजा रोखीकरण, गट विम्याचे हक्काचे पैसे मागत आहेत. परंतु अजूनही त्यांना त्यांचे पैसे मिळालेले नाहीत. या संदर्भात यशोदा दशरथ भालेराव, गोविंद दगडू साळवे, कुसुम मोहन साळवे, इंदुबाई साळवे, भीमाबाई कांबळे आदी सफाई कर्मचारी नगराध्यक्ष फरीन बेगम यांना निवेदन सादर करण्यासाठी आले होते. नगरसेवक अब्दुल जावेद यांनी निवेदन स्वीकारले. यशोदा भालेराव यांनी पालिकेत ३५ वर्षे सेवा केली. त्या सेवानिवृत्त होऊन एक वर्ष झाले आहे. त्यांना सहा लाख रुपये जीपीएफ व एकूण रक्कम मिळणे आवश्यक होते. मात्र त्यांना केवळ एक लाख रुपये मिळाले.गोविंद दगडू साळवे यांचे २०१६ मध्ये निधन झाले. त्यांना चार मुली आहेत. त्यांचे लग्न कसे करायचे, हा प्रश्न त्यांच्या कुटुंबीयांपुढे आहे. कुसुम साळवे यांचे पती मोहन साळवे यांनी नगरपालिकेत २२ वर्षे नोकरी केली. सात वर्षांपूर्वी आजारपणामुळे त्यांचे निधन झाले. इंदुबाई साळवे यांचे पती अशोक साळवे यांनी ४० वर्षे सेवा केली. त्यांचेही निधन झाले आहे. भीमाबाई भिकन कांबळे, शाम शंकर कांबळे यांनी ३४ वर्षे सेवा केली. त्यांना निवृत्त होऊन २ वर्षे झाली आहेत. नगर परिषदेत हे कर्मचारी पैसे मिळावेत म्हणून चकरा मारत आहेत. कर्मचाऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणे अपेक्षित नगरसेवक अब्दुल जावेद यांनी हे प्रकरण अत्यंत गंभीर असल्याचे सांगितले. आस्थापनाप्रमुख प्रशांत देशपांडे यांच्याकडे त्यांनी विचारणा केली. देशपांडे यांनी सांगितले की, मी या कर्मचाऱ्यांचे जीपीएफ, ग्रॅच्युइटी, गट विमाच्या विवरणासह वेतन पत्रक वेळोवेळी सादर केले आहे. त्यांच्या खात्यावर पैसे जमा होणे अपेक्षित आहे. मागील दहा वर्षांपासून कर्मचारी व त्यांचे वारसदार जीपीएफ, ग्रॅच्युइटी, रजा रोखीकरण, गट विम्याचे हक्काचे पैसे मागत आहेत. परंतु अजूनही त्यांना त्यांचे पैसे मिळालेले नाहीत. नगर परिषदेत हे कर्मचारी पैसे मिळावेत म्हणून चकरा मारत आहेत. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी आहे. आढावा घेऊन पैसे अदा होईल Ãकर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी २००६ पूर्वी नगरपालिकेला शासनाकडून निधी येत नव्हता. वेतनाची तजवीज नगरपालिकेस स्वतः करावी लागत असे. त्यामुळे कर वसुलीतून आलेल्या रकमेतून या कर्मचाऱ्यांना मूळ वेतन देण्यात येत होते. जीपीएफ, नगर परिषदेतील व इतर रक्कम जमा करण्यात येत नव्हती. त्यामुळे हा प्रश्न निर्माण झाला आहे. कन्नड नगरपालिकेत असे ५५ कर्मचारी आहेत. त्यांचे साधारणत: दिड कोटी रुपये थकीत आहेत‌. शासनाकडे निधीची मागणी केली आहे. – रवींद्र लांडे, मुख्याधिकारी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *