Headlines

कृउबास संचालकांत एकमताच्या ‎अभावामुळे मंत्री महाजनांची एन्ट्री:ऐनवेळी नाव बदलण्याच्या परंपरेमुळे सूत्रे घेतल्याची चर्चा‎




जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीवर‎ भाजपची पकड मजबूत असली तरी‎ अंतर्गत राजकारणाने सध्या डोकेवर‎ काढले आहे. विशेष म्हणजे नवीन ‎टर्ममधील दोन्ही सभापतींना अविश्वास‎ प्रस्तावामुळे आपली पदे गमवावी लागली‎ आहेत. या पार्श्वभूमीवर, संचालकांवर‎ विश्वास नसल्याने अखेर राज्याचे‎ ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी‎ आता या निवडीचे नियंत्रण स्वतःच्या ‎हातात घेतले आहे. बाजार समितीच्या राजकारणात ‎अविश्वासाचे सत्र सुरूच आहे. यापूर्वीचे‎ सभापती श्यामकांत सोनवणे सुमारे अडीच‎ वर्षे पदावर होते; मात्र त्यांच्यावरही‎ अविश्वास दाखवण्यात आला होता.‎ त्यानंतर आलेले सुनील महाजन यांना तर‎ अवघ्या 7 महिन्यांतच पाय उतार व्हावे ‎लागले. 12 संचालकांनी त्यांच्याविरुद्ध 27 एप्रिल रोजी अविश्वास प्रस्ताव दाखल‎ केल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला.‎भाजपचे संख्याबळ अधिक असूनही‎ संचालकांमध्ये एकमत होत नसल्याचे या ‎वारंवार होणाऱ्या अविश्वास प्रस्तावांतून ‎स्पष्ट होत आहे. आजच्या बैठकीत‎ कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होते यावर‎ 18 मे रोजी होणाऱ्या निवडीची केवळ‎ औपचारिकता अवलंबून असेल. सभापती पदासाठी लक्ष्मण पाटील‎की मनोज चौधरी? चुरस टोकाला‎ सध्या सभापती पदासाठी भाजपच्या गोटात दोन‎ नावांची मोठी चुरस आहे. पूर्वी सभापती असताना ‎अविश्वास प्रस्तावानंतर पायउतार झालेले लक्ष्मण ‎पाटील पुन्हा स्पर्धेत आहे. मंत्री महाजन यांनीच‎ त्यांना शब्द दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.‎ तर सहकार क्षेत्रातील 35 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव ‎असलेले मनोज चौधरी यांनीही प्रबळ दावा केला‎ आहे. त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे अनुभवाच्या जोरावर‎ संधी मागितली असून, संधी मिळाल्यास चौधरी‎ पहिल्यांदाच सभापती होतील.‎ संचालकांची आज बैठक होणार‎ उपनिबंधकांच्या पत्रानुसार 18 मे रोजी सभापती‎ निवडीसाठी अधिकृत बैठक बोलावण्यात आली ‎आहे; मात्र तत्पूर्वी 15 मे रोजी मंत्री गिरीश महाजन‎ यांच्या उपस्थितीत संचालकांची महत्त्वपूर्ण बैठक‎ आयोजित करण्यात आली आहे. यात सभापतीच्या ‎नावाबाबत सविस्तर चर्चा केली जाण्याची शक्यता‎ आहे. दरम्यान, नाशिक कुंभमेळ्याच्या नियोजनात ‎व्यग्र असल्यामुळे मंत्री गिरीश महाजन यांनी यापूर्वी‎ वेळ दिला नव्हता; मात्र आता त्यांच्या उपस्थितीत‎नव्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.‎बाजार समितीत ऐनवेळी नाव बदलण्याची परंपरा ‎असल्याने, आजच्या बैठकीकडे आता राजकीय‎ पदाधिकऱ्यासह जळगावकरांचे लक्ष लागले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *