Headlines

काळीज पिळवटणारा अपघात!:अकोल्यात भरधाव दुचाकीची चिमुकल्याला भीषण धडक; थरार CCTV मध्ये कैद




अकोला शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. शहरातील एका निवासी वसाहतीमध्ये भरधाव वेगाने येणाऱ्या एका दुचाकीने रस्त्यावरून जाणाऱ्या एका चिमुकल्याला जोराची धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, दुचाकीच्या धडकेने मुलगा हवेत उडून रस्त्यावर जाऊन पडला. या अपघातात चिमुकला गंभीर जखमी झाला असून हा अंगावर काटा आणणारा संपूर्ण थरार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. स्थानिकांची मदतीसाठी धाव; बालकाची प्रकृती गंभीर हा भीषण अपघात घडताच आजूबाजूला असलेल्या नागरिकांनी तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली. रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या त्या चिमुकल्याला स्थानिकांनी अत्यंत तत्परतेने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सध्या या बालकावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. निवासी भागात भरधाव वाहन चालवणाऱ्यांवर नागरिकांचा तीव्र संताप या घटनेनंतर अपघातग्रस्त परिसरात नागरिकांनी एकच गर्दी केली होती. शांत आणि निवासी भागात लहान मुले रस्त्यावर खेळत किंवा चालत असतात, अशा भागातही अत्यंत बेजबाबदारपणे आणि सुसाट वेगाने वाहने चालवणाऱ्या चालकांविरोधात नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. “अशा बेशिस्त वाहनचालकांमुळे निष्पाप जीवांचा बळी जात आहे,” अशा भावना संतप्त नागरिकांनी व्यक्त केल्या. या प्रकरणाची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन दोषी दुचाकी चालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. हे ही वाचा.. ‘मी जे करतो ते फुल प्रूफ करतो!’:सचिन अहिरांच्या पक्षप्रवेशावर एकनाथ शिंदेंची फटकेबाजी, उद्धव ठाकरेंवरही साधला थेट निशाणा शिवसेना ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसला असून सचिन अहिर यांनी ठाकरे गटाला रामराम करत थेट शिंदे सेनेकडून उपसभापती पदाचा अर्जही भरला आहे. त्यामुळे हा उद्धव ठाकरे यांच्यासह आदित्य ठाकरे यांनाही मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. त्यामुळे राज्यात ऑपरेशन टायगर सुरूच असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांनी विधान परिषद उपसभापतीपदासाठी महायुतीकडून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या घडामोडीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत सचिन अहिर यांचे पक्षात स्वागत केले आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. “आम्ही कोणतेही तोडकाम करत नाही, जोडकाम करतो,” असे सांगत शिंदे यांनी शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्यांमागे विकासाचा अजेंडा असल्याचा दावा केला. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *